Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ९ जुलै, २०२०

कोरोनावर मात करण्यासाठी मालेगावच्या युनानी काढ्याने ग्रामीण भागातील जनतेला लागले भुरळ..!



तोरखेडा ता.शहादा प्रतिनिधी बाबु मण्यार कोरोनावर मात करण्यासाठी मालेगावच्या युनानी काढ्याने ग्रामीण भागातील जनतेला भुरळ घातली आहे.

अल्पावधीतच मालेगाव शहरातून कोरोना रुग्ण कमी झाल्याने हा काढाच गुणकारी ठरत असल्याने कडू काढ्याची गोड कहाणी सध्या लोकप्रिय झाली आहे. काढा खरेदीसाठी मालेगाव दाखल झालेले नागरिक येथील दळणवळण पुर्ववत बघून आश्चर्य व्यक्त करीत आहे.

राज्यात कोरोनाच्या रुग्णात अव्वलस्थानी असलेले मालेगाव शहर कोरोनामुक्त कोरोनामुक्तिच्या उंबरठ्यावर आहे. रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी मालेगावात मिळणारा जोशांदा काढा आणि सर्दी, खोकल्यावरील युनानी उत्पादने मोठ्या प्रमाणात खरेदी करून ते बनवण्याची प्रक्रिया ग्रामस्थ समजून घेत आहेत. 

कसमादे भागात नातेवाईकांनी काढा घ्यावा असे सल्ले दिले जात आहेत. मौखिक लोकप्रियताक लाभल्याने ग्रामीण भागात काढा घेण्याची चढाओढ लागली आहे अनेक लोक मालेगाव येऊन युनानी काढा घेत आहेत मालेगावचा युनानी काढा लोकप्रियतेत आघाडी घेत आहे.कोरोनाच्या भीतीने ग्रामीण भागातील दहशत आणि शहरातील बिनधास्त दळणवळण कोड्यात टाकणारे ठरत आहे पानटपरी सलून चहा हॉटेल फिरती दुकाने आधी सुरळीत सुरू असताना मास्क ना घालताच मालेगाव शहर वावरता आहे ही परिस्थिती बघून खरेदीदार कोड्यात पडत आहेत. 

काढा तयार करण्याची प्रक्रिया समजून घेत अतिशय स्वस्तातला हा उपाय करून बघू असे म्हणतात युनानी गाड्याची चर्चा होत आहे.

मालेगावात नोकरीनिमित्त कार्यरत घटकांनी या कार्यावर प्रथम पसंतीची मोहर उमटवली आता त्याचे लोन ग्रामीण भागात पसरत आहे मालेगावात कोरोना रुग्णांची संख्या रोडावल्या ने या गाड्यावर विश्वासर्हता अधिक घट्टपणे व्यक्त होत आहे मन्सूरा हॉस्पिटलचे डॉक्टर सय्यद मीनहजसह व त्यांच्या पथकाने मालेगाव भेटीत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना या काढ्याविषयी माहिती दिली होती शासन स्तरावरून या काढ्याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध