Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ४ जुलै, २०२०
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध सेल, फ्रंटल ऑर्गनाझेशनची बैठक संपन्न..!
धुळे प्रतिनिधी सचिन वाफेकर:आज धुळे येथील राष्ट्रवादी भवन येथे नवनियुक्त धुळे शहर जिल्हाध्यक्ष श्री.रणजीत राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली विविध सेल, फ्रंटल ऑर्गनाझेशनचे शहरध्यक्ष, कार्याध्यक्षाची बैठक पार पडली. रणजीत राजे भोसले यांनी शहर जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सेलच्या अध्यक्ष, कार्याध्यक्ष यांनी श्री.रणजीत राजे भोसले यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
सदर बैठकीत रणजीत राजे भोसले यांनी जिल्ह्याच्या सर्व सेलच्या अध्यक्ष, कार्याध्यक्ष, यांना संबोधित केले. रणजीत राजे भोसले यांनी पक्षाच्या विविध सेल, फ्रंटल ऑर्गनाझेशन, सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष आदींना कार्यकारणी कशा पध्दतीने करावी, विविध कार्यकारणीमध्ये कोणाला स्थान द्यावे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांना, नवीन कार्यकर्त्यांना जोडून शहरामध्ये भक्कम नेटवर्क कसे तयार होईल या आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
तसेच विविध सेलच्या काही अडचणी, समस्या व त्यावरील उपाययोजना व भविष्यातील नियोजन यावर चर्चा करण्यात आली. सर्व सेलच्या अध्यक्षांना आवाहन करतांना रणजीत राजे भोसले म्हणाले की, समाजातील सर्व सामान्यापर्यंत पोहचून शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची भक्कम फळी तयार करावी.
यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष जमीर शेख, समीर खान, युवक सेलचे शहराध्यक्ष कुणाल पवार, महिला शहर जिल्हाध्यक्ष सरोजिनी ताई कदम, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शिरसाठ, सामाजिक न्याय विभाग उपजिल्हाध्यक्ष दिपक देवरे, धुळे शहर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष भोला सैंदाणे, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.हर्षल भामरे, कार्याध्यक्ष निरज सुर्यवंशी, युवती सेल हिमानी वाघ, विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष राज कोळी, सेवादल सेलचे जिल्हाध्यक्ष नंदू येलमामे, मंगेश जगताप, सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष आरिफ मुनावर, महिला अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष शकीला बक्ष, अर्बन सेलच्या जिल्हाध्यक्षा जया सांळूके, संजिवनी पाटील, पदवीधर सेलचे जिल्हाध्यक्ष कुणाल वाघ, युवकचे जिल्हाउपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, भिका भाऊ नेरकर महासचिव राष्ट्रवादी काँग्रेस सेवालद धुळे, प्रमोद सांळूके संस्थापक सदस्य धुळे राष्ट्रवादी, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा