Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ४ जुलै, २०२०
Home
/
Unlabelled
/
जामनेर शहरात कोरोनाबाधिताचा मृत्यू; साडेतीन तास वाट पाहुन सुध्दा शासकीय रुग्णवाहीका न आल्यामुळे रुग्ण दगावला नातेवाईकांचा आरोप..!
जामनेर शहरात कोरोनाबाधिताचा मृत्यू; साडेतीन तास वाट पाहुन सुध्दा शासकीय रुग्णवाहीका न आल्यामुळे रुग्ण दगावला नातेवाईकांचा आरोप..!
जामनेर प्रतिनिधी: शहरातील जामनेरपुरा भागातील रहीवासी असलेले 65 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा आज उपजिल्हा रुग्णालयात दुपारी २.३० वा.दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत सविस्तर वृत्त असेकी जामनेरपुरा येथील रुग्णाचा अहवाल पाँजीटीव्ह आल्यानंतर त्या रुग्णाला आज सकाळी दि.4 जुलै रोजी अकरा वाजता उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले .
परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना जळगाव जिल्हा कोवीड रुग्णालयात दाखल करण्यासाठी शासकीय रुग्णवाहिका बोलविण्यात आली.परंतु 108 नंबर वर फोन करुन सुध्दा साडेतीन तासांनंतर सुध्दा रुग्णवाहीका आली नाही नाईलाजाने रुग्णांच्या नातेवाईकांनी खाजगी रुग्णवाहीका बोलविली तरीही कोरोनाबाधित रुग्णाला जळगाव कोविड रुग्णालयात पाठविण्यात आले नाही
त्यामुळे त्या रुग्णाचा दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जामनेर उपजिल्हारुग्णालयात खाजगी रुग्णवाहिकेत दुर्दैवी मृत्यू झाला.उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक व डाँक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आमच्या रुग्णाचा बळी गेला असुन रुग्णाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.यावेळी उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येने जामनेरपुरा भागातील नातेवाईकांचा जमाव जमा झाला होता.
रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करुन रुग्णालयातच कोरोनाबाधित मृत रुग्णाचा मृतदेह जाळुन टाकु अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी प्रशासकीय अनास्थामुळे अनेक रुग्णांचे बळी जात असुन ! त्यामुळेच जिल्ह्यात मृत्यूदर वाढत असुन संबधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करुन मनुष्यवधाचा गुन्हा करावा अशी मागणी करुन संताप व्यक्त केला. यावेळी नगरसेवक बाबुराव हिवराळे,, श्रीराम महाजन,सुभाष पवार, यांच्या शेकडो नागरिक हजर होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा