Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ७ जुलै, २०२०
मंठा जि.जालना..! येथील विवाहित तरुणी वैष्णवी गोरे हिचे निर्घुण हत्या..!
तरी सदरील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी व तिच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, शिंदखेडा शहर यांच्या वतीने तहसिलदार साहेबांना मा. जिल्हाध्यक्ष राजेश बागुल यांच्या अध्यक्षतेखाली निवेदन देण्यात आले.
सदरील आरोपी शेख अल्ताफ शेख बाबू यांने केलेल्या अमानुष कृत्याबद्दल त्यास फाशीची शिक्षा मिळावी म्हणून एडवोकेट उज्वल निकम यांची नियुक्ती करून सदर न्यायालयातील प्रक्रिया फास्ट ट्रॅक न्यायालयात निकाली लावून सदर आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी असे निवेदनाद्वारे सांगण्यात आले.
त्यावेळी सुनील चौधरी (नगरसेवक तसेच कार्याध्यक्ष समता परिषद), बापुसो दिनेश माळी (जिल्हा संघटक), योगेश बागुल (युवा जिल्हाध्यक्ष), चंद्रकांत बैसाणे (जिल्हा युवक संघटक), गणेश खलाणे (शहर अध्यक्ष), प्रांजल विसपुते (शहर उपाध्यक्ष), कैलास वाघ (तालुका सल्लागार), मनोज चौधरी (शहर कार्याध्यक्ष) आदी उपस्थित होते..
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा