Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ७ जुलै, २०२०
Home
/
Unlabelled
/
शेतकऱ्यांना पीकविमा संरक्षण रक्कम तात्काळ मिळावी..! रावेर युवासेनेचे तालुका अध्यक्ष प्रविण पंडित यांची मागणी..!
शेतकऱ्यांना पीकविमा संरक्षण रक्कम तात्काळ मिळावी..! रावेर युवासेनेचे तालुका अध्यक्ष प्रविण पंडित यांची मागणी..!
प्रतिनिधी रावेर अजीज शेख: जे शेतकरी पीकविमा पात्र झालेले आहेत त्यांची पीकविमा संरक्षण रक्कम लवकरात लवकर मिळावी या विषयाचे निवेदन रावेर तालुका युवासेना तालुकाप्रमुख प्रवीण पंडित व युवासेना उपतालुका प्रमुख तुषार कचरे यांनी मुख्यमंत्री ,कृषीमंत्री,जळगांव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील,आमदार चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.
जळगाव जिल्यातील शेतकरी प्रचंड अडचणींना सामोरे जात असताना , त्यांना देशावर आलेल्या या महाभयंकर कोरोना महामारीचा सामना करत असताना त्यांना अनेक अडचणी येत आहेत..
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची केळी मातीमोल भावात विकली जात तर आहेच त्यांनी केळीला लावलेला खर्चही निघू शकत नाहीय तसेच त्यांच्या अन्य पिकांनाही योग्य तो भाव मिळत नसल्याने शेतकरी प्रचंड निराशाजनक व तणावात आलेले आहेत , पाऊसही वेळेवर पडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट आलेले आहे.
म्हणून आम्ही जळगाव जिल्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने आपणास विनंती करतो की, जे शेतकरी पीकविमा पात्रता धारक आहेत त्यांना पीकविमाची रक्कम लवकरात लवकर मिळावी जेणेकरून जो अवघ्या जगाचा पोशिंदा आहे शेतकरी राजा त्यांच्या हक्काची असलेली रक्कम त्यांना लवकरात लवकर मिळावी व आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी राज्याला आपण या कोरोना महामारीच्या काळात उभं करावं अशी अपेक्षा करतो.
महाराष्ट्र राज्यातील सरकार शेतकऱ्यांसाठी सदैव तत्पर असतांना मुख्यमंत्री व कृषीमंत्री यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून नक्कीच जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची असलेली पीकविमा संरक्षण रक्कम लवकरात लवकर मिळेल अशी खात्री युवासेना तालुका प्रमुख प्रवीण पंडित व युवासेना उपतालुका प्रमुख तुषार कचरे यांनी व्यक्त केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा