Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ७ जुलै, २०२०
Home
/
Unlabelled
/
अनुराग भगवान जगदाळे या कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्याने १७व्या वाढदिवसानिमित्त..! वर्षभरात साचवलेल्या, बचत केलेल्या १७००/- रुपयांचा धनादेश "मुख्यमंत्री सहाय्यता निधी सुपूर्द..!
अनुराग भगवान जगदाळे या कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्याने १७व्या वाढदिवसानिमित्त..! वर्षभरात साचवलेल्या, बचत केलेल्या १७००/- रुपयांचा धनादेश "मुख्यमंत्री सहाय्यता निधी सुपूर्द..!
धुळे येथील झेड.बी.पाटील महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेणाऱ्या निजामपूर-
जैताणे (ता.साक्री) येथील अनुराग भगवान जगदाळे या कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्याने १७व्या वाढदिवसानिमित्त वर्षभरात साचवलेल्या, बचत केलेल्या १७००/- रुपयांचा धनादेश "मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९" या नावाने निजामपूरचे मंडळाधिकारी विजय बावा यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी निजामपूरचे तलाठी प्रशांत माळी, जैताणेचे तलाठी भूषण रोजेकर, वासखेडीचे तलाठी सुनील साळुंखे, धनंजय वाघ, आशुतोष जगदाळे, प्रा.भगवान जगदाळे यांच्यासह कोतवाल व ग्रामस्थ आदी उपस्थित होते. प्रा.भगवान जगदाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
दरम्यान अनुरागने २०१७ व २०१८ मध्ये स्वतःच्या शेतात वाढदिवसानिमित्त लावलेल्या अनुक्रमे तीन वर्षीय व दोन वर्षीय झाडांचेही वाढदिवस साजरे केले. उद्या अनुरागच्या हस्ते परिसरात वृक्षारोपणही करण्यात येणार आहे. वड व पिंपळ आदी उपयुक्त वृक्षांची लागवड केली जाणार असल्याची माहिती अनुरागने दिली. केक कापून व दिवे विझवून वाढदिवस साजरा करून पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करण्यापेक्षा कोविडग्रस्तांना सुविधा मिळाव्यात व पर्यावरण संवर्धन व्हावे, म्हणून वाढदिवसानिमित्त मदतनिधीसह वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही अनुरागने सांगितले.
यापुढेही वेळोवेळी असेच विधायक व अनुकरणीय सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहितीही अनुरागने दिली. अनुराग येथील आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे इंग्रजी विषयाचे शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रा.भगवान जगदाळे यांचा कनिष्ठ सुपुत्र आहे. तहसीलदार प्रवीण चव्हाणके, नायब तहसीलदार अंगद आसटकर यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते ऍड.शरदचंद्र शहा, माजी सरपंच अजितचंद्र शहा आदींनी अनुरागचे विशेष कौतुक केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा