Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ६ जुलै, २०२०
Home
/
Unlabelled
/
उस्मानाबाद जिल्ह्यातील शेळगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मॅनेजर कोरोना पॉझिटिव्ह, गावात कडेकोट बंदोबस्त..!
उस्मानाबाद जिल्ह्यातील शेळगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मॅनेजर कोरोना पॉझिटिव्ह, गावात कडेकोट बंदोबस्त..!
परंडा (राहूल शिंदे) दि.6 तालुक्यातील शेळगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक येथे नुकतेच नियुक्त झालेले बँक मॅनेजर साहेबांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.त्यांच्या स्वाबचे नमुने सह्याद्री हॉस्पिटल, पुणे येथे तपासणीसाठी पाठवले होते.ते काल पॉझिटिव्ह आढळून आले.
सध्या ते विश्वराज हॉस्पिटल दौंड येथे उपचार घेत आहेत.या पार्श्वभूमीवर गावात आज तहसीलदार साहेब ,बीडीओ साहेब आंबी पोलीसस्टेशनचे ए.पी.आय पालवे साहेब यांनी भेट देऊन गावचा आढावा घेतला.व संपूर्ण गाव तीन दिवसांसाठी कडेकोट बंद करण्यात आले आहे.सदर व्यक्तीच्या संपर्कातील पाच व्यक्तींना स्वाब तपासणी करण्यासाठी परंडा येथे पाठवण्यात आले आहे.
उद्या रात्रीपर्यंत किंवा परवा पर्यंत रिपोर्ट येणे अपेक्षीत आहे.सदर कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती ठाणे रिटर्न असून करमाळा येथे वास्तव्यास आहे.
शेतकऱ्यांची सध्या पीक कर्ज व पीक विमा भरण्यासाठी बँकेत लगभग सुरू आहे.प्रशासनाने बँकेत तात्काळ दुसऱ्या कर्मचाऱ्याची नेमणूक करून बँकिंग सेवा सुरळीत करावी. जेणेकरून शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही.असे अहवान शेतकरी वर्ग करत आहे.
यावेळी डॉ.भोसले साहेब ,सरपंच-बप्पा दैन.ग्रामसेवक-बाबु दैन,तलाठी, पोलीसपाटील,पंचायत समिती सभापती सतीष दैन,पंचायत समिती सदस्य सतीष देवकर आदी उपस्थितीत होते.
आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजनाची अमलबजावणी करावी व प्रशासनाला सहकार्य करावे.नागरिकांनी घाबरून न जाता घरीच सुरक्षीत रहावे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा