Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ११ जुलै, २०२०

सावळदे येथे कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त शेतीविषयक मार्गदर्शन..! शासनाच्या विविध योजनांची थेट शेतकऱ्यांशी चर्चा..!


कुरखळी वार्ताहर:योगेश्वर मोरे

महाराष्ट्र शासनाच्या वतीने 1 जुलै रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंती निमित्त कृषि विभाग शिरपुर व कृषि विज्ञान केंद्र धुळे यांच्या सयुक्त विद्यमाने कृषि दिन मौजे सावळदे येथे वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.

१ जुलै ते ७ जुलै पर्यंत कृषि संजीवनी सप्ताह साजर करण्यात येत असून त्या निमित्त संपूर्ण तालुक्यात नियोजन आहे. प्रत्येक गावात बैठक आयोजित करून विविध योजनांवर कृषि सहाय्यकांमार्फत मार्गदर्शन करण्यात येत आहे त्या नियोजना नुसार मौजे कुरखळी येथेही १ जुलै रोजी सकाळी आठ वाजता बैठक घेण्यात आली.

कार्यक्रम सामाजिक अंतर ठेवून तसेच मास्कचा वापर करून पार पाडला शिवाय शासनाच्या कोरोना संबंधित सूचनांचे काटेकोर पालन करण्यात आले.

शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या प्रधानमंत्री फसल बीमा योजना, हवामान आधारित फलपिक विमा योजना, स्व गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, म ग्रा रो ह यो फलबाग लागवड योजना, कै भाऊसाहेब फुंडकर फलबाग लागवड योजना, उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान अन्तर्गत विविध यांत्रिक औज़ारे योजना, ठिबक सिचन, आदि योजनांवर मार्गदर्शन करण्यात आले..

डॉ पंकज पाटिल यांनी कापूस पिकावर सविस्तर मार्गदर्शन केले गुलाबी बोंड अली नियंत्रणासाठी तसेच मका सोयाबीन वरील लश्करी अली नियंत्रणासाठी एकात्मिक किड व्यवस्थापन तंत्रा वर मार्गदर्शन केले.
तसेच श्री अनिल निकुंभ, तालुका कृषि अधिकारी शिरपुर यांनी पिक विमा योजनेत कर्जदार बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्चिक असून कर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा योजनेत सहभाग घ्यावयाचे नसल्यास अंतिम मुदतिच्या ७ दिवस आधी बैंकेत लेखी कळविनेबाबत विनंती केली, तसेच उत्पादनावरील खर्च कमी करून एकात्मिक पिक व्यवस्थापन तंत्राचा वापर करून पर्यावरनाशी जुळवुन घेत उत्पन्न व उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

चालू वर्षी कोरोना परिस्थितिमुळे कार्यक्रम अल्पावधित आटोपला सावळदे येथील शेतकरी राजेश जाधव यांच्या शेतावर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन सावळदया चे कृषि सहाय्यक शिवराज माळी यांनी केले.

कार्यक्रमास कृषि विज्ञान केंद्र धुळे येथील डॉ श्री एस पी सोनवणे ,प्राध्यापक -(कृषि अभियांत्रिकी विभाग,) डॉ एस डी पाटील, सहा. प्राध्यापक (कृषि विस्तार विभाग), श्री डॉ पंकज पाटिल, शास्त्रज्ञ (पिक संरक्षण) यांचे सह श्री अनिल निकुंभ, तालुका कृषि अधिकारी शिरपुर, श्री विशाल मोटे, मंडल कृषि अधिकारी शिरपुर, श्री आर डी मोरे कृषि पर्यवेक्षक, श्री शिवराज माळी कृषि सहाय्यक, तसेच सावळदे येथील प्रगतिशील शेतकरी वेडू मछिन्द्र राजपूत, राजेश दिलीपसिंग जाधव ,अमोल राजपूत, महेंद्र राजपूत आदि शेतकरी उपस्थित होते.


1 टिप्पणी:

प्रसिद्ध