Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३ जुलै, २०२०
Home
/
Unlabelled
/
मंठा जि.जालना येथील पिडीत नवविवाहिता वैष्णवी गोरे हत्या प्रकरणी चौकशी करून आरोपीला कठोर शिक्षा दया-अमळनेर महात्मा फुले ब्रिगेडची मागणी..!
मंठा जि.जालना येथील पिडीत नवविवाहिता वैष्णवी गोरे हत्या प्रकरणी चौकशी करून आरोपीला कठोर शिक्षा दया-अमळनेर महात्मा फुले ब्रिगेडची मागणी..!
अमळनेर येथील नायब तहसिलदार यांच्याकडे पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन
अमळनेर प्रतिनिधी:मंठा जिल्हा जालना येथील पिडीत नवविवाहिता वैष्णवी नारायण गोरे हत्या प्रकरणी सखोल चौकशी करून सबधित आरोपी विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करून योग्य रितीने तपास होऊन आरोपी शेख अल्ताफ बाबू यास कठोर शिक्षा व्हावी म्हणून आपण कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून विशेष लक्ष केंद्रित करुन माळी समाजातील अंत्यत गरीब परिस्थितीत आपल्या दोन मुलांना संभाळून जीवन जगणाऱ्या नारायण गोरे यांच्या नवविवाहित वैष्णवी चा मंठ्यातील गुंड शेख अल्ताफ यांने अमानुष पणे भर बाजारपेठेत धारदारशस्त्राने गळा चिरडुन केलेली हत्या लोकशाही ला काळीमा फासविणारी आहे
या घडलेल्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून तालुक्याचे कर्तव्यदक्ष नायब तहसिलदार म्हणून आपणास नम्र विनंती करतो की सदरील आरोपींना फास्ट कोर्टात प्रकरण देऊन आरोपी स फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी चौकशी निपक्ष पाती व्हायला हवी करिता हे निवेदन सादर
सदरील प्रकरणी अजून कोणी सहभागी असेल तर त्याना सुध्दा सह आरोपी करून पिडीत गोरे कुंटुबियाना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे ही विनंती.
अश्याप्रकारचे निवेदन महात्मा फुले ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष शिवाजी महाजन यांचा मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी अमळनेरचे नायब तहसीलदारांना निवेदन दिले,यावेळी महात्मा फुले ब्रिगेड अमळनेरचे तालुकाध्यक्ष राजेश महाजन,उपाध्यक्ष डॉ.अनुप महाजन,सचिव भुषण महाजन,कोषाध्यक्ष गौरव माळी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा