Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ५ जुलै, २०२०
Home
/
Unlabelled
/
मानवी जीवनातील व्यवहारात अजुनही माणुसकी जीवंत आहे..! सौ सुजाता फुलपगारे,नाशिक..!
मानवी जीवनातील व्यवहारात अजुनही माणुसकी जीवंत आहे..! सौ सुजाता फुलपगारे,नाशिक..!
नाशिक प्रतिनिधी:आज गुरु पौर्णिमेच्या दिवशी मला भेटलेली दोन काँलेजची मुले ही अशीच म्हणत असतील का?... ज्यांनी आम्हाला घडवलं, ज्यांनी आम्हाला या जीवनात जगायला शिकवलं, लढायला शिकवलं अशा प्रत्येकांच्या आशीर्वादाला आत्मसात करून आम्ही त्यांचे ऋणी आहोत, ऋण फेडण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत आणि जे काही समस्यांच्या प्रसंगात असतील त्यांच्या पाठीशी उभे राहणे, त्यांना सहकार्य करणे आमच्यासाठी आमच्या गुरुची सेवाच असेल...? मग तो लहान असो किंवा मोठा असो...? असाच काहीसा प्रसंग माझ्यासमोर आला. माझ्या तनिष्का साडी सेंटर वर अनेक महिला ह्या येत असतात आणि त्या स्त्रीयांची वस्त्रे खरेदी करत असतात. तेव्हा मी माझ्या दुकानाच्या माहितीसाठी मीही आपले माहीतीकार्ड त्यांना देत असते. माझ्या दुकानावर नेहमी येणा-यात माझी मैत्रिण मेधना दिक्षितमॅडम त्यातल्या एक आहेत.
काही दिवसांपूर्वी त्यांनी माझ्या दुकानातून काही ब्युटिक सामान खरेदी केला त्यावेळी मी त्यांना माझे माहितीकार्ड असेच माहीतीसाठी दिले. आज दिक्षितमॅडम गुरुगोविंदसिंह काँलेज जवळील रस्त्यावर आल्या व त्यांचे मनिपर्स तेथेच हरवली परंतु काही सामाजिक जबाबदारी पाळणारे आणि ख-या गुरुची शिक्षा आत्मसात केलेले.
मोहित व्हिजन, बौरेश पाटील, युवराज दरेकर,ही तरुण मुलं तिथे आली आणि त्यांना दिक्षित मॅडमची मनिपर्स दिसली. त्यांनी ती ओपन करुन पाहीली असता त्यात काही रुपये, बरेच बँन्कांचे कार्ड आणि तनिष्का सारीजचे माहितीकार्ड त्यांना दिसले.
त्यांनी मला त्वरीत संपर्क केला आणि मी त्यांना दुकानात बोलावून घेतले तसेच दिक्षित मॅडम याना फोन करून बोलावून घेतले आणि त्याना त्याची साहित्य देण्यात आले मग त्या तिन्ही मुलाचे आभार व्यक्त केले. त्यांना आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुलाबाचे फुल देऊन त्यांच्या कार्याला आम्ही सलामच केला.
समाजघटकहो, मी प्रत्येकाकडून काही ना काही नकळत खुप काही शिकत असते अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद आणि आभार ही आणि शेवटी म्हणते अजुनही काही ठिकाणी माणुसकी जीवंत आहे।। गुरु पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा