Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ५ जुलै, २०२०

शहादा तालुक्यातिल तोरखेडा गावातिल ६५ वर्षीय महिलेला कोरोनाचि लागण झाल्याने गावात उपाय योजना करण्यात आल्यात..!



तोरखेडा ता शहादा प्रतिनिधी बाबु मण्यार: शहादा तालुक्यातिल तोरखेडा गावातिल ६५ वर्षीय महिलेला कोरोनाचि लागण झाल्याने गावात उपाय योजना करण्यात आले आहे.

या रुग्णाच्या अतिसंपर्कतिल आठ जणांना व पुणा पाच जणांना शहादा येथेल विलागिकरण कक्षात ठेवण्यात आले होते पैकी ७६ वर्षीय याचे नंदूरबार येथे चार दिवसा पुर्वी मृत्यू झाल्या होता त्याच्या सह आज पुणा ६ जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने तोरखेडा सह परिसरात ग्रामस्य धस्तावले आहे.

तोरखेडा गावातील एका रुग्णाला कोरोनाचि लक्षणे जाणवल्याने त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या स्वब नमुन्याचा अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आल्याने गावात ख़बरदारी चा उपाय योजना ग्रामपंचायतिल काटेकोर पणे पाळले आहे संपुर्न गाव कटेनमेंट झोन क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. गावाचा सीमा बरेकेट लावून बंद करण्यात आले आहेत जवळीळ हिंगणि व दोंदवाडा, फ़ेस हे गाव बंफ़र झोन मध्ये आहेत बंफ़र झोन मधील हिंगणी गावात हिं ४९ वर्षीय पुरुषाचा रिपोट पॉझिटिव आल्याने तेथील १३ लोकांना विलगीकक्षात नेण्यात आले आहे त्याच्या रिपोर्ट येणे बाकी असल्याने ग्रामास्यथाचे लक्ष लागून आहे.

आज जिल्हावासीयांसाठी दिलासा आणि चिंतेची वार्ता सोबतच आली आहे. बाधित 25 जणांनी कोरोनावर मात करून संसर्गमुक्त झाल्याने दिलासा मिळाला, तर अवघ्या काही मिनिटात अहवालात दहा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने चिंता वाढली. गेल्या दोन दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन येत आहेत. 

आज रविवारी दुपारी आलेल्या अहवालात २५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांनी कोरोनावर मात केल्याने संसर्गमुक्त झाले आहे. त्यामुळे त्यांना दुपारी एक वाजता घरी सोडण्यात आल्याने , ही जिल्हावासियांसाठी दिलासादायी वार्ता असतानाच लागलीच काही मिनिटात दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा चिंता वाढली. यामध्ये शहादा येथील २ व शहादा तालुक्यातील तोरखेडा येथील ६ जणांना तर तळोदा येथील १ व जिल्हा रुग्णालयातील १ अशा एकूण १० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शहादा येथील जिभाऊ नगरातील 42 वर्षीय महिला 49 वर्षे पुरुष व शहादा तालुक्यातील तोरखेडा येथील 22 वर्षीय पुरुष, 57 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय महिला, 78 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, 46 वर्षीय पुरुष, तळोदा येथील दामोदर नगरातील 50 वर्षीय पुरुष व नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील 34 वर्षीय पुरुष अशा दहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यात पाच व्यक्ती या एकाच कुटुंबातील आहे. शहादा येथील दोन व्यक्ती यापूर्वीच वर्गीकरण कक्षात आहेत. त्यामुळे जिल्हावासियांना मिळणारा दिलासाबरोबरच चिंतेची वार्ता सोबतच आली. 
      
तोरखेडा येथे ग्रामपंचायत मार्फत निजनतुकरन करण्यात आले व लागडाउन चे काटेकोर पालन करण्यात येथ आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध