Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १० जुलै, २०२०

कोरोना रोगप्रतिबंधात्मक औषधीचे कुसुंबा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोफत वाटप..!



रावेर प्रतिनिधी अजीज शेख 

रावेर तालुक्यातील कुंसुबा येथील मुबारक तडवी शिवसैनिक यांच्या हस्ते आयुष मंत्रालयाद्वारे प्रमाणित कोव्हीड - १९ विरोधात प्रतिबंधात्मक आणि रोगप्रतिकारक शक्ती वर्धक होमिओपॅथिक औषधी आसॅनिकम अल्बम - ३० यांचे मोफत वितरण कुसुंबा या गावातील
 वयोवृद्ध महिला, शेतमजूर, गोरगरीबांना 
मोफत वाटप करण्यात आले, 

तसेच ही औषधी घेण्याचीही पध्दत व सविस्तर माहिती श्री मुबारक तडवी
 यांनी संबंधितांना दिली,व कोणालाही श्वास घेण्यासाठी अडचणी येत असेलं, सर्दी खोकला ताप, अशक्तपणा,घशात खवखव , डोकेदुखी इ लक्षणेही वाटल्यास वा आढळून येतं असल्याचं जाणविल्यास लगेचच उपचार सुरू करावेत, व जवळील आरोग्य केंद्र वा आरोग्य सेवक व गावातील सरपंच तलाठी ग्रामसेवक यांना कळवावे,व अशा व्यक्ती नी घाबरून न जाता, बचावात्मक पवित्रा घेतला पाहिजे,. तसेच महाराष्ट्र शासन यांनी कोरोना बाधित रूग्ण यांना मोफत उपचार पद्धती योजना  नुकतीच सुरू केली आहे, याचीही मार्गदर्शन केले,

नेहमी हात स्वच्छ साबणाने धुवावेत, माॅस्क वापरावे किंवा रुमालाने नाक ,तोंड व्यवस्थित बांधावे, व सोशल डिस्टींगशनचे पालन नेहमीच करावे, असे आव्हान मुबारक तडवी, शिवसैनिक यांनी सर्व सामान्य जनतेला केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध