Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २ जुलै, २०२०

जिल्ह्यात पोलीस व म.न.पा.आणि इतर शासकीय विभाग यांची संयुक्त Crack Down मोहीम..!


शिरपूर(प्रतिनिधी)शासनाच्या Mission Begin Again च्या नियमावली नुसार लॉक डाऊन शिथील करण्याचे आदेश करण्यात आले परंतु धुळे शहर व जिल्हयात मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सींग न पाळणे,रेस्टॉरन्ट,हॉटेल, खादय पदार्थ स्टॉल इतर मान्यता दिलेल्या आस्थापना या दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ उघडया ठेवणे व मान्यता नसलेल्या आस्थापना उघडया ठेवणे,दिलेल्या मर्यादेपेक्षा वाहनावर जास्त संख्येने प्रवासी वाहतुक करणे इ.कारणामुळे शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन होतांना दिसुन येत नाही.

त्यामुळे धुळे शहर, जिल्हा तसेच शिरपुर विभागात कोरोना ग्रस्तांचे प्रमाण वाढत आहे.म्हणुन धुळे जिल्हा पोलीस व म.न. पा.धुळे व इतर शासकीय विभाग यांची संयुक्त Crack Down मोहिम आयोजित करण्यात आली आहे.

त्यामध्ये मास्क न लावणा-या विरुध्द कठोर आर्थिक दंडाची कारवाई करण्यात येईल,दिलेल्या मर्यादे पेक्षा जास्त संख्येने
प्रवासी वाहतुक करणा-या वाहनावर मो.वा.का.अंतर्गत कारवाई का रण्यात येऊन सदर वाहने जप्त केली जातील.रेस्टॉरन्ट,हॉटेल, खादय पदार्थ स्टॉल इतर मान्यता दिलेल्या आस्थापना या दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ उघडया ठेवल्यास म.न.पा.धुळे तसेच इतर नगर पालिका व धुळे जिल्हा पोलीस दल यांचेकडुन संबंधितांवर कायदेशिर कारवाई करण्यात येईल. —————————————– लॉक डाऊनच्या काही अटी जरी शिथील करण्यात आलेल्या आहे तरी करोना अजुन संपलेला नाही.त्यामुळे आवश्यक असेल त्यावेळीच घराबाहेर पडावे,मास्क,सॅनि टायझरचा वापर करावा, अनावश्यक गर्दी करणे टाळावे.शासनाच्या निर्दशाचे पालन करावे अन्यथा नियमाचा भंग करणा-या विरुध्द गुन्हे दाखल करुन कायदेशिर कारवाई करण्यात येईल. 

चिन्मय पंडित,जिल्हा पोलीस 
अधीक्षक,धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध