Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२०

मराठवाड्यातील 10वी उत्तीर्ण गरजू युवतींसाठी शिष्यवृत्ती योजना !!!



उस्मानाबाद (राहूल शिंदे) दि.4
मराठवाड्यातील वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकरीवर्ग व भूमिहीन मजुर मोठ्याप्रमाणावर आत्महत्या करत आहेत,कुटुंबावर ओढवलेली गरीब परिस्थिती गरीब कुटुंबातील अभ्यासू व हुशार मुलीसाठी अडथळा ठरू नये म्हणून,एस.के.एफ.इंडिया लिमिटेड कंपनी आपल्या समाजिक उत्तरदायित्व कार्याअंतर्गत मराठवाडा विभागातील गरीब,गरजू, होतकरू मुलींसाठी एस.के.एफ शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवत आहे.

निवड झालेल्या मुलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च (कॉलेज फी, हॉस्टेल फी,जेवण) या शिष्यवृत्ती योजनेतून दिला जातो. 

उल्लेखनीय बाब म्हणजे एकदा निवड झालेली विद्यार्थीनी राज्यातील कोणत्याही नामांकीत कॉलेजमध्ये शिक्षण घेऊ शकते. शैक्षणिक प्रगती चांगली असेल तर राज्यातील कोणत्याही पदवी पर्यंत पात्र ठरू शकते.

या शिष्यवृत्ती करीता अर्ज करण्यासाठी मुख्य तीन पात्रता अटी आहेत.

1)अर्जदार मुलगी फक्त मराठवाडा महसुली विभागात कायम वास्तव्य करणारी असावी.

2)अर्जदार मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दीड लाख पेक्षा कमी आसवे.ही शिष्यवृत्ती गरीब कुटुंबातील होतकरू मुलींसाठी आहे.

3)अर्जदार मुलगी विज्ञान किंवा वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊ इच्छित असल्यास इयत्ता दहावीत मान्यताप्राप्त बोर्ड परीक्षा 2020 च्या निकालानुसार किमान 85% गुण तर कला व व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश इच्छुकांस किमान 75% गुण प्राप्त असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.त्यासाठी संकेतस्थळ  www.udaan.skfindiacsr.com या संकेतस्थळावर भरायचा आहे.

सूचना:- 1)अर्ज भरण्यापूर्वी प्रथम नोंदणी करून आपले युजर अकाऊंट बनवावे.नंतर लॉगइन करून अर्ज भरावा. संकेतस्थळावर सर्व योजनेची सर्व माहिती दिली आहे.
2) अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.

3) ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केल्यावर त्याची एक प्रत स्वतः जवळ ठेवा.(प्रत्येक्षपणे कुठेही अर्ज दाखल करण्याची गरज नाही.)

4) अंतिम दिनांक 12ऑगस्ट 2020 आहे 

अधिक माहितीसाठी संपर्क:- 
ग्रामीण श्रमीक प्रतिष्ठान,लातूर
SKF युवती शिष्यवृत्ती कार्यक्रम-उडान,तिसरा मजला LDCC बँकेच्यावर,राजीव गांधी चौकाच्या जवळ,औसा रोड लातूर  संपर्क क्रमांक:- 8554830064
मिसकॉल देऊन माहिती मिळवण्यासाठी क्रमांक:- 9999768598

तरी मराठवाड्यातील गरीब व होतकरू पालकांनी परिस्थितीला खचून न जाता,आपल्या मुलीचे शिक्षण पूर्ण करावे.असे आवाहन ग्रामीण श्रमीक प्रतिष्ठान चे संचालक श्री.प्रशांत सुडे यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध