Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२०
भीषण शेतकरीआत्महत्याचे..!
नापीकीमुळे शेतकरी आत्महत्यावर अंकित ठाकरे यांनी केलेली वास्तववादी कविता
यंदा पुर्ण पह्याटी जळली अन् सोयाबीन निघालच नाही
म्हणून माह्या शेतकरी बापानं धुऱ्यावरच्या बाभुळीच्या झाडाले विहीरतलंं पाणी ओढाच्या दोरानं फाशी घेतली त्याचा पंचनामा झाला, चौकशी झाली पन त्याची अजूनही कोणाले काहीच सर्दी गर्मी नाही एखादा नेता अभिनेता मेला की जसा बाप्पा सोशल मिडीयावर अश्रुचा पुरच वाहतो अन् रोज माह्यावाला शेतकरी बाप कोण्याना कोण्या कारणामुळं आत्महत्या करतो त्याचा शोकही कुठे होत नाही याच मुळे आम्ही पुर्ण खचतो भौ बाप गेला तेव्हापासून माह्यावाली माय चावचिंद झाली कायजीनं बापानं काढलेलं बँकेच कर्ज सावकाराकडून पेरणीसाठी घेतलेले ते व्याजानं पैसे सारा सारा कर्जाचा डोंगर वाढतच जाणार आता रोज बाप गेला तेव्हा आले होते दोन चार साहेब घरी आम्हाले तेव्हढ्यापुरता आधार द्याले आता मी,माह्यावाली बहिण अन् माह्यावाली माय तिघच असतो आम्ही भिंतिवर लावलेल्या बापाच्या फोटोकडं एकटक बघतं
कवी/लेखक:अंकित शिला उत्तमराव ठाकरे (दाभाडा,धामणगाव रेल्वे अमरावती)
संकलन:- राहूल शिंदे (विभागीय संपादक,उस्मानाबाद,9975114800)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा