Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२०

आजोती-इंदापुर येथे भोईसमाजाच्या वतीने नारळीपौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला..!



अजोती/इंदापुर प्रतिनिधी:भीमानदीच्या काठावरील प्रदेशात असलेल्या आणि उजनी धरणाच्या कुशीत बसलेल्या आजोती-इंदापुर येथे नारळीपौर्णिमेचा म्हणजे भोई, कोळी, कहार, केवट, मल्लाव ढिवर या समाजाचा हा पारंपरिक सण वैद्यकीय विभाग आणि शासनाचे निर्देश लक्षात ठेऊन साजरा करण्यात आला. या भागात भीमा, चंद्रभागा आणि उजनीधरण यांचा सतत वरदहस्त हा भोई कोळी आणि तत्सम मच्छीमार समाज घटकाच्या डोक्यावर असतो. 

पंढरपूरात सातत्याने जयघोष होत असतो की, चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी... विठ्ठल विठ्ठल जय हरी बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी। आजच्या ह्या सणाच्या प्रसंगी भोई कोळी तत्सम मच्छीमार समाजघटकाने, हे चंद्रभागा माता राज्यात यंदा चांगला पाऊसपाणी होऊ दे, मच्छीमारांच्या, बळीराजाच्या शेतात, घरात समृद्धी नांदू दे.‘कोरोनाचं संकट दूर करुन सर्वांना चांगलं आरोग्य दे.जनतेला सुखी ठेव. कोरोनाविरुद्ध लढत असलेले डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सफाईकर्मचारी,अंगणवाडी ताई, आशाताई, पोलिस या सगळ्या कोरोनाच्या विरुद्ध कार्यकरत असलेल्या योद्ध्यांना बळ दे. त्यांचं संरक्षण कर. हे भिमाई माता महाराष्ट्राचं भलं कर. राज्यावरचं प्रत्येक संकट दूर करण्याची शक्ती आम्हाला दे असे साकडं भिमामातेच्या चरणी भोई कोळी कहार केवट मल्लाव ढिवर मच्छीमार समाजघटकाने घातले. अजोती येथील समाजबांधवांनी पुजा केली. 

राज्यातील सर्व जनतेला नारळी पौर्णिमेनिमीत्त शुभेच्छा दिल्या व पुढच्या नारळी पौर्णिमेला कोरोनाचं संकट जगातून हद्दपार होईल आणि पुन्हा आपण नाचत, वाजतगाजत नारळीपौर्णिमा हा आपल्या कोळी-भोई कहार केवट मल्लाव ढिवर समाजाचा सण साजरा करु असा विश्वास सदरच्या मच्छीमार समाजबांधवांनी व्यक्त केला. कोरोनाचं संकट लक्षात घेऊन माता-भगिनीं तसेच सर्व भक्तांनी, जनतेनं अधिक काळजी घ्यावी असे आवाहनही मच्छीमार समाजसेवकांनी यावेळी केले. 

घरी रहा आणि सुरक्षित राहा प्रशासनाला सहकार्य करा, ही इच्छा मच्छीमार समाजाने या प्रसंगी व्यक्त केली. यावेळी नानासाहेब दरदरे, सुरेश दरदरे, नितीन नागरे, संजय दरदरे (सरपंच आजोती) बापू दरदरे (गांव तंटामुक्ती अध्यक्ष) दादा सलामपुरे, उत्तम दरदरे, संजय नगरे (ग्रामपंचायत सदस्य) हरिदास दरदरे, मोहन दरदरे,शिवाजी नगरे, संतोष दरदरे (जिल्हा सत्र न्यायालय पुणे) प्रवीण भैय्या दरदरे आदी मच्छीमार समाजबांधव हजर होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध