Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०

बंद दवाखान्याच्या अभावी 14 महिन्याच्या चिमुकलीचा सर्पदशांने मृत्यू...!



परंडा(राहूल शिंदे) दि.28 तालुक्यातील शेळगाव येथे (दि27) रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास आरती शांतलिंग वायफळकर फक्त चौदा महिन्याच्या चिमुकलीला रात्री झोपेत असताना सर्पाने दंश केला. ती चिमुकली रडत-रडत झोपेतून उठली, तिच्याआईने आपल्या बाळाला जवळ घेतले. त्या बाळाचे रडणे थांबात नाही हे पाहून बाळाच्या आईने बाळ जवळ घेऊन दुध पाजले असता थोड्याच वेळात बाळाच्या तोडांतुन फेस येण्यास सुरवात होऊ लागल्याने हा सर्व प्रकार तिच्या आई वडिलांच्या लक्षात आला.

घरात पाहणी केली असता चावलेला सर्प घरामध्ये दिसला, तो सर्प मारून, आई-वडीलाने रात्रीच्या 1:30 च्या दरम्यान शेळगाव पासून 30किमी अंतरावर असलेल्या करमाळ्याला गेले आसता करमाळा मध्ये दवाखाने रात्रीचे उघडे नव्हते. हे पाहून हताश होऊन ते परत परंड्याला 40-45 किमी अंतर पार करून परंडा दवाखान्यात गेले असता डाँक्टरानी त्या चिमुकलीला मृत्यू घोषित केले.

जर करमाळा येथील दवाखाने रात्रीचे चालू असते तर निष्पाप चिमुकलीचे प्राण वाचले असते, अत्यावश्यक सेवेचा कालावधी तर 24तास चालू असून दवाखाने बंद कसे?  प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित दवाखान्यावर कारवाई करावी जेनेकरून तरी भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत.व रुग्णांना योग्य व वेळेवर उपचार मिळतील.

या चिमुकलीच्या म्रूत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध