Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०

समाजपरिवर्तक मा.खा.ओमराजे निंबाळकर साहेब आणि कार्यसम्राट आमदार मा कैलास दादा पाटील साहेब



उस्मानाबाद (राहूल शिंदे)दि.28
समाजसेवक आणि समाजपरिवर्तक दोन्हीही गोष्टी सारख्याच असल्या तरी त्यात खूप मोठे अंतर आहे....
उदा.आपल्या जिल्ह्यात काहीच विकास झालेला नसताना त्याला विकास म्हणून स्वतःचे साम्राज्य उभे करणे म्हणजे समाजसेवा असे करत इतर ठिकाणी (जिल्ह्याबाहेर) विकास करुन मेवा खाणारे इतर नेते कुठे ......

आणि आपल्या जिल्ह्याला विकासाची भूक लागली असता त्याला दरवेळी फक्त निवडणुकीपुरते तात्पुरते आश्वासन न देता, बड्या बड्या पोकळ गप्पा न मारता, जिल्हा विकासासाठी एक शाश्वत रोडमॅप तयार करुन, त्यानुसार प्रत्येक क्षण जिल्हा विकासासाठी अहोरात्र झटणारे, प्रसंगी इतर नेते घरी सुखरुप बसले असताना स्वतःच्या जीवावर उदार होऊन प्रत्येक आठवड्यात कोरोना महामारीमध्ये सुद्धा मुंबई येथे जाऊन उस्मानाबाद जिल्हा विकासासाठी अत्यावश्यक अशा स्वतंत्र विद्यापीठ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व तुमच्या आमच्या गोरगरीबांच्या मुलांनाही अधिकारी बनता यावे यासाठी स्वतंत्र MPSC/UPSC अभ्यासिकेची मागणी जोमाने लावुन धरणारे, त्यासाठी संबंधित मंत्री महोदयांकडे आग्रही भूमिका मांडत मॅरेथॉन बैठकांचा सपाटा लावणारे जाँबाज आणि धुरंदर नेतृत्व म्हणजे मा. खा. ओमदादा आणि तरुण तडफदार तथा लोकप्रिय आमदार मा कैलास दादा पाटील हे आहेत. 
                           
या गोष्टी का गरजेच्या आहेत तर निती आयोगात आकांक्षित राहिलेल्या देशातील  सर्वात खालच्या तळाच्या(शेवटच्या 3) जिल्ह्यांमध्ये आपला जिल्हा आहे मित्रांनो....
माझ्या जिल्हयातील विकासाचा बॅकलॉग भरुन काढण्यासाठी अथक परिश्रम घेणारे हे दोन ढाण्या वाघ आपले लोकप्रतिनिधी आहेत याचा प्रचंड अभिमान वाटतो आहे....

आणि हे सगळ ते का करतायत तर जिल्ह्य़ातील सामान्य माणसाला शाश्वत विकास काय असतो हे दाखवुन, त्याच्यावर अशी विकासाच्या बाबतीत फक्त लातुर सारख्या जिल्ह्याकडे उदाहरण म्हणून न पहायची वेळ नाही यावी म्हणून,आपल्या जिल्ह्यात विकासाची गंगा आणण्यासाठी अहोरात्र भगीरथ प्रयत्न करणारे दबंग खासदार ओमराजे निंबाळकर साहेब आणि कार्यसम्राट आमदार मा कैलास दादा पाटील साहेब म्हणजे आधुनिक समाज परिवर्तकच....!
खरोखरच जिल्ह्यासाठी खासदारसाहेब व आमदारसाहेबांचे कार्य कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे.असेच कार्य भविष्यातदेखील आपल्या हातून होत रहावे यासाठी खूप खूप शुभेच्छा! ! !




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध