Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

15 ऑगस्ट दिनानिमित्त उघड्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या 32 गरजू मुलांना व निराधार 5 महिलांना नवीन कपड़े वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला..!




शिरपूर प्रतिनिधी:15 ऑगस्ट दिनानिमित्त मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट व जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या माध्यमातून शिरपुर तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी, तहसीलदार आबासाहेब महाजन,व शिरपुर पोलिस स्टेशन चे  ए.पी.आय चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरपुर शहरातील उघड्यावर उदरनिर्वाह करणारे 32 गरजू मुलांना व 5 निराधार महिलांना उत्कृष्ट पद्धतिचे नवीन कपड़े वाटप  व जेवनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
 
15 ऑगस्ट 1947 ला भारत देशाला स्वतंत्रता मिळाली असून आज 2020 पर्यन्त ह्या 74 वर्षात देखील गरीबी ला मात्र स्वतंत्रता मिळाली नाही त्या मुळेच मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट  व जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या संयुक्त विद्यमानाने ह्या 32 गरजू मुलांच्या व निराधार 5 महिलांच्या जीवनात एक आनंदाचा सण साजरा करण्यासाठी हा अनोखा कार्यक्रम आयोजित केला होता
सदर कार्यक्रमात कोरोना च्या संकटकालीन परिस्थितित दयनीय अवस्थेत अडकलेल्या मानव जातीचे रक्षण करण्यासाठी कौतुकास्पद कामगिरि केल्या बद्दल तहसिलदार आबासाहेब महाजन व ए.पी.आय चंद्रकांत पाटिल यांच्या समवेत इतर 13 उत्कृष्ट कामगिरी कणाऱ्या  प्रतिष्टित व्यक्तिन्ना मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट च्या वतीने कोरोना योध्या सन्मान पत्र देखिल  देण्यात आले.
 
कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट चे धुळे जिल्हा व उत्तर महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष रामचंद्र येशी,धुळे जिल्ह्या महिला अध्यक्षा हेमलता येशी,जिल्ह्या संघटक राजेन्द्र कोळी,तालुका अध्यक्ष जीवन चौधरी,तालुका उपाध्यक्ष योगेंद्र सोनवणे,शहर अध्यक्ष लक्ष्मीकांत वारुळे व जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष विकास सेन ,कार्याध्यक्ष कुलदीप राजपूत,संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष मनोहर पाटील,राजेन्द्र पाटील, रविन्द्र चौधरी, सुनील सोनवणे,भीमसिंग राजपूत,यशवंत निकवाड़े,व शहरातील  प्रतिष्टित मान्यवर  उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध