Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०
उस्मानाबादच्या खो-खो खेळाडू कु.सारिका काळे यांना अर्जुनपुरस्कार जाहीर ! ! !
उस्मानाबाद (राहूल शिंदे) दि.19
जिल्ह्याची आंतरराष्ट्रीय खेळाडू, भारतीय महिला खो-खो संघाची
कर्णधार,शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त, तालुका क्रीडा अधिकारी, सुवर्णकन्या कु.सारिका सुधाकर काळे (तालुका क्रीडा अधिकारी, तुळजापूर) यांना क्रीडा क्षेत्रातील भारतातील मानाचा सर्वोच्च ''अर्जुन पुरस्कार'' नुकताच जाहीर झाला आहे.
अर्जुन पुरस्कार हा राष्ट्रीय खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्याची प्रथा भारत सरकारने 1961 मध्ये सुरू केली. 5 लाख रुपये रोख, कांस्य धातूपासून बनलेला अर्जुनाचा छोटा पुतळा आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
अर्जुन पुरस्कार प्राप्त होणाऱ्या कु.सारिका काळे या उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिल्याच महिला खेळाडू आहेत.यांना क्रीडा शिक्षक डॉ.श्री.चंद्रजीत जाधव सर यांचे मार्गदर्शन लाभले.
अर्जुन पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल जिल्हा क्रीडा क्षेत्रात आनंदचे वातावरण आहे, क्रीडा, शैक्षणिक,सामजिक,राजकीय क्षेत्रातून अभिनंदन करून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
खरोखरच जिल्ह्यासाठी ही अभिमानाची व खूप आनंदाची बातमी आहे.
तरुणगर्जना टीमच्या वतीने देखील हार्दिक अभिनंदन व पुढील कारकीर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा! ! !
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा