Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०

भूम कोविड-19 सेंटरमध्ये मोठ्याप्रमाणात गैरसोयी व पेशंटला गैरवर्तणूक..!



भूम(राहूल शिंदे) दि.28 जिल्ह्यात  मोठ्याप्रमाणात कोरोनासंसर्ग वाढत आहे त्यापार्श्वभूमीवर भूम तालुक्यातील गोलेगाव येथे कोविड-19 सेंटर गेल्या सहा महिन्यापासून चालू आहे.सदर सेंटर मध्ये पेशंटच्या बाबतींत अनेक समस्या जाणवत आहेत.

त्याबाबत पेशंटच्या व नातेवाईकांच्या वारंवार तक्रारी येत होत्या.यामध्ये 
1) महिलांच्या बाबतीत सुरक्षितता नाही, विद्युतपुरवठा रात्रीच्या वेळी सुरळीत सुरू नाही.

2)कोरोना पेशंटला स्वतंत्र खोल्या उपलब्ध करून दिल्या जात नाहीत.
3)एकाच हॉलमध्ये कोरोना पेशंट आहेत, जुने व नवीन पेशंट असे कोणतेच विलगिकरण नाही,त्या ठिकाणी सेनेटायझरचा वापर केला जात नाही.4)स्वच्छताचा अभाव जाणवत आहे. स्वच्छतागृहासाठी मुबलक पाणीपुरवठा केला जात नाही. 
5) डॉक्टर वेळेवर येत नाहीत, पेशंटला अरेरावीची भाषा वापरली जाते.वशीलाबाजी होत आहे.

तरी याबाबत तहसील कार्यालयाचे प्रभारी तहसीलदार मा.बोरकर साहेब यांच्यासोबत विश्वमराठा संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री.प्रशांतदादा भोसले यांनी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली असता मा.तहसीलदार साहेब यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देऊन आलेल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक त्या सुविधा लवकरच पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केला.

यांच्या सविस्तर लेखी तक्रारीचे निवेदन विश्वमराठा संघ धाराशिव व विश्वजन आरोग्य सेवा समिती धाराशिव जिल्ह्याच्या वतीने सौ.छायाताई भगत, श्री.प्रशांतदादा भोसले यांच्या मार्गदर्शना खाली आज मा.तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले यावेळी विश्वजन आरोग्य सेवा समितीचे जिल्हा समन्वयक तथा विश्व मराठासंघ धाराशिव जिल्हाध्यक्ष श्री.सोमनाथ कोकाटे, नागेश नागटिळक,परमेश्वर रसाळ,परंडा तालुका आरोग्यदूत राहूल शिंदे आदी यावेळी उपस्थितीत होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध