Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०
Home
/
Unlabelled
/
सततच्या पावसामुळे व नैसर्गिक रोगराई मुळे पिकांची झालेली नुकसानभरपाई मिळावी म्हणून तहसीलदारांना निवेदन..! सत्याग्रह शेतकरी संघटना..!
सततच्या पावसामुळे व नैसर्गिक रोगराई मुळे पिकांची झालेली नुकसानभरपाई मिळावी म्हणून तहसीलदारांना निवेदन..! सत्याग्रह शेतकरी संघटना..!
शेगांव(प्रतिनीधी उमेश राजगुरे)गेल्या काही दिवसात जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. काही ठिकाणी उगफुटी सारखी अतिवृष्टी झाली तर बहुतांश ठिकाणी रोगराई मुळे मुंग, उडीद, तीळा सारख्या कमी दिवसात येणाऱ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. इतकंच काय तर कर्ज काढून दुबार तीवार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या हातात पिकाचा दानाही येणार नाही एवढे नुकसान झाले आहे.
काही भागात ढगफुटी सारखी अतिवृष्टी झाल्यामुळे जमिनी पाण्याने सरळून गेल्या. आज शेतकऱ्यावर पुन्हा संकट आले आहे. त्यामुळे शेतकरी आता देशोधडीला लागला आहे अगोदरच कोरोना चे संकट हाताला काम नाही शेती मध्ये पीक पेरणी केली खरी पण ती देखील निसर्गाच्या कोपामुळे निघून गेली. म्हणून शेतकन्यांच्या बांधावर जाऊन नुकसान प्रस्त पिकांची व शेतीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करा व नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवा. पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांनी मोबाईल मधून अँप डाऊन लोड करून घ्यावे ही अट ही अट रद्द करून सार्वत्रिक
नुकसानीचा एकच सर्वे करून अहवाल सादर करावा,तसेच कृषी विभागाने पिकविमा धारक सर्व शेतकन्यांतर्फे एकच तकार पिकविमा कंपनी कडे करून त्यांना पिक विम्याचा मोबदला शेतकऱ्यांना तात्काळ देण्यास सांगावे. अन्यथा आम्ही लोकशाही मागनि तीव्र आंदोलन करू, आंदोलनात होणारी नुकसान भरपाई ला आपण जवाबदार राहाल याची नोंद घ्यावी.
प्रमुख मागण्या:
1) शासनाने सतत च्या पावसामुळे मूग, उडीद, तीळ, सोयाबीन पिकाची झालेली नुकसान भरपाई द्या
2) ढगफुटी झालेल्या भागातील खरडून गेलेल्या शेतीची झालेली नुकसान भरपाई था
३) पिकविमा धारक शेतकऱ्यांना सामूहिक सर्वे करून नुकसान भरपाई द्या
4) सार्वत्रिक नुकसान असल्यामुळे अँप वर तक्रारीची अट रद्द करा
5) सोयाबीनचे बोगस बियाणे देणाऱ्या कंपन्यांचे परवाने रद करा
निवेदनकर्ते सत्याग्रह शेतकरी संघटना (युवा आघाडी) सत्याग्रह शेतकरी संघटना (युवा आघाडी) शे.अयाज शे.अमीर - सत्याग्रह शेतकरी संघटना (युवा आघाडी),गणेश सडतकार पाटील,
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा