Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०
Home
/
Unlabelled
/
स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये शिरपूर शहर महाराष्ट्रात 6 वे, देशाच्या पश्चिम झोन मध्ये 6 वा क्रमांक..!
स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये शिरपूर शहर महाराष्ट्रात 6 वे, देशाच्या पश्चिम झोन मध्ये 6 वा क्रमांक..!
शिरपूर ठरले उत्कृष्ट, स्वच्छ, सुंदर व हरित शिरपूर.......
शिरपूर - स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या उत्तम कामगिरीमुळे व प्रभावी अंमलबजावणी मुळे केंद्र शासनाने शिरपूर शहराला संपूर्ण भारताच्या पश्चिम झोन मध्ये 6 वा क्रमांक व संपूर्ण भारत देशात 42 व्या क्रमांकाचे उत्कृष्ट शहर घोषित केले असल्याने शिरपूरकरांची मान उंचावली आहे. ही बाब शिरपूरच्या सर्व नागरिकांसाठी अभिमानाची व भूषणावह आहे असे लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी सांगितले.
माजी शालेय, शिक्षण व युवक कल्याण मंत्री अमरिशभाई पटेल यांनी 1985 पासून सर्वांना हेवा वाटावा असे शिरपूर शहर बनविण्याचा नेहमीच यशस्वी प्रयत्न केला असून शहरवासीयांनी देखील वेळोवेळी त्यांना साथ दिली आहे. स्वच्छ, सुंदर व हरित शिरपूर हे अनेक चांगल्या सोयी सुविधांमुळे अनेकांनी आपल्या पसंतीचे शहर म्हणून नेहमीच प्राधान्य दिले असल्याचे दिसून आले आहे.
स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये 50 हजार ते 1 लाख पेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांपैकी शिरपूर शहराने संपूर्ण भारताच्या पश्चिम झोन मध्ये 6 वा, महाराष्ट्रात 6 वा क्रमांक तसेच संपूर्ण भारत देशात 42 वे उत्कृष्ट शहर जाहीर केल्याने सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
यापूर्वी देखील शिरपूर नगर परिषदेला शासनाचे अनेक बक्षिसे मिळाल्याने देशात व राज्यात नामांकित शहरांपैकी शिरपूरने आपले आदर्शवत स्थान कायम राखले आहे. यापूर्वी शिरपूर नगर परिषदेने संत गाडगेबाबा अभियानात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावले आहेत. पाणी पुरवठा योजनेबाबत देखील विशेष पुरस्कार प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र राज्याने पर्यावरणाबाबत वसुंधरा पुरस्कार देवून देखील गौरविले आहे. देशातील पहिले स्वच्छता मंदिर हे शिरपूर वरवाडे नगर परिषदेत उभारण्यात आल्याची बाब देखील गौरवपूर्ण ठरली आहे.
"स्वच्छ शिरपूर, सुंदर शिरपूर, हरित शिरपूर" कायमस्वरूपी राहण्यासाठी स्वच्छतेचा वसा कायमस्वरूपी जपण्यासाठी वेळोवेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल व सर्वांनी प्रयत्न केले. तसेच सातत्याने व नियमितपणे नगरपरिषदेचे कामकाज आदर्शवत सुरु ठेवले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेची यशस्वी घोडदौड सुरु आहे.
केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या स्वच्छ भारत अभियानात आतापर्यंतच्या सर्वात मोठया मोहीमेत दरवर्षी शिरपूर नगर परिषदेने उल्लेखनीय काम केले आहे.
शिरपूर शहर उत्कृष्ट जाहीर झाल्याने लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, सर्व नगरसेवक, सर्व नगरसेविका, मुख्याधिकारी अमोल बागुल, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी, नगर अभियंता माधवराव पाटील, नोडल ऑफिसर सागर कुलकर्णी, स्वच्छता निरीक्षक जितेंद्र अहिरे, आरोग्य सहाय्यक दिपाली साळुंके, सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा