Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १० ऑगस्ट, २०२०

सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल..!



रावेर तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथील आरोपीस निंभोरा पोलिसांनी केले अटक.
निंभोरा ता रावेर सोशल मीडिया वर फेसबुक पोस्ट द्वारे धार्मिक भावना दुखावल्या बद्दल निंभोरा येथील आरोपी रवींद्र पंडित महाले याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरहून आरोपीने दि ५रोजी आपल्या सोशल मीडिया फेसबुक द्वारे धार्मिक भावना दुखेल अशी अशी पोस्ट मजकूर फेसबुक वरती टाकले होते.

ही आक्षेपार्ह मजकूर समाजबांधवांच्या निदर्शनास आल्या नंतर निंभोरा पोलिसांत संशयित आरोपीवर वर कारवाईची मांगणी केली होती.त्यावर पोलिसांनी ताबडतोब  दखल घेत दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यास पोलीस कर्मचारी स्वप्नील पाटील यांच्या फिर्यादिवर भा द वी कलम २९५ अ व ५०५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. 

कोणाचीही धार्मिक भावना दुखवणारी पोस्ट,फोटो,किंवा मजकूर सोशल मीडियावर प्रसारित करू नये तसेच आक्षेपार्ह मजकुराला लाईक,शेअर ही करू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.तसेच जर कोणी सोशल मीडिया च्या माध्यमातून समाजाची धार्मिक भावना दुखेल अशी पोस्ट केल्यास कायदेशीर सक्त कारवाई करण्यात येईल.पुढील तपास निंभोरा पोलीस स्टेशनचे सा. पो.निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश शिंदे,रा.का.पाटील,विकास कोल्हे,अनिल साळुंखे,सुनील वंजारी करीत आहे.

निंभोरा पोलिसांकडून नागरिकांना 

आवाहन:

प्रत्येकाने सोशल मीडियाचा वापर जपून करावे तसेच तसेच कोणत्याही जाती धर्माविषयी पोस्ट टाकताना काळजीपूर्वक वाचून व समजून घ्यावे तसेच त्यात काही आक्षेपार्ह मजकूर किंवा फोटो असल्यास त्याला त्याचक्षणी डिलिट करावे.कोणाची धार्मिक भावना दुखेल असे मजकूर शोधलं मीडिया वर अजिबात पोस्ट व शेअर तसेच ती पोस्ट ला लाईक सुद्धा करू नये व आक्षेपार्ह पोस्ट च्या समर्थनात मुळीच कमेंट्स करू नका असे आवाहन निंभोरा पोलिसांनी केले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल तसेच दोन समाजात तेढ निर्माण होईल असे मजकूर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केल्यास कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध