Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२०
Home
/
Unlabelled
/
सामाजिक कार्यकर्त्या ज्योती भोई यांची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या...! त्या रासप च्या युवती जिल्हाध्यक्षा होत्या...!
सामाजिक कार्यकर्त्या ज्योती भोई यांची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या...! त्या रासप च्या युवती जिल्हाध्यक्षा होत्या...!
अमळनेर (प्रतिनिधी) रासपच्या युवती जिल्हाध्यक्षा ज्योती धनराज भोई यांनी स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी १० रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास शहराच्या पैलाड भागात घडली. तर रासपची ही लढवय्या ‘ज्योती’ विझल्याने पक्ष आणि कुटुंबात दुःखाचा अंधार पसरला आहे.
आपल्या आक्रमकतेने अनेक पीडितांना न्याय मिळवून दिल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
बहुचर्चित व्यक्तिमत्व ज्योती भोई यांनी गेल्या काही दिवसांपासून अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार केल्याने व नुकताच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. नगर जिल्ह्यातील एका महिलेशी त्यांचे भांडण झाले होते.
त्या धाडशी स्वभावाच्या होत्या. त्यांनी अचानक आत्महत्या केल्याने शहरात चर्चेला उधाण आले होते त्यांच्याजवळ सुसाईड नोट सापडल्याची चर्चा पसरली होती. मात्र या संदर्भात तपासाधिकारी सहा पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर याना विचारले असता त्यांनी फक्त तपास चालू आहे असे उत्तर दिले. याप्रकरणी समाधान भोई यांनी अमळनेर पोलिसात खबर दिली की त्यांचे चुलत बंधू भगवान विठ्ठल भोई यांनी सांगितले की ज्योती हिने घरातील जिन्याच्या रेलिंगला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.
ग्रामीण रुग्णालयात तिचे शवविच्छेदन करण्यात आले. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास प्रकाश सदगीर करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संपादकीय :- राज्यात गाजत असलेल्या कथित शालार्थ आयडी प्रकरणाने आता केवळ काही व्यक्ती किंवा संस्थांपुरता मर्यादित प्रश्न राहिलेला नाही. उलट, य...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा