Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०
चोपडा महाविद्यालयात कोरोना योद्धा डॉ.मनोज पाटील यांचा सत्कार..!
चीन देशातील उहान शहरातून संपूर्ण जगभर पसरलेला कोविड या विषाणू मुळे मानवी जीवन खुपमोठ्या प्रमाणात प्रभावित होऊन लाखो लोकांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे.
अशा आपत्तीच्या काळात वैद्यकीय व विविध सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी कोविड विषाणू विरोधात योध्यासारखी भूमिका वठवत अनेकांचे प्राण वाचवले आहेत.
याच भूमिकेतून चोपडा येथील कॉटेज हॉस्पिटल चे मुख्य वैदकीय अधिकारी डॉ.मनोज पाटील यांनी दिवसरात्र स्वतःला झोकून देत कार्य केल्याने अनेकांचे जीव वाचविण्यात त्यांना यश आले आहे.
डॉ.मनोज पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती,शेतकरी कृती
समिती,पत्रकार,डॉकटर,प्राध्यापक,इंजिनीयर,इतर सेवा क्षेत्रातील दाते यांच्या सहकार्याने हॉस्पिटल मध्ये आवश्यक त्या सुविधाही उपलबद्ध करून घेतल्या आहेत.
या सर्व कार्याची दखल घेत महात्मा गांधी शिक्षण मंडळ चोपडा येथील महाविद्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.मनोज पाटील यांना आमंत्रित करून त्यांचा आणि संस्थेतील शिक्षकेतर कर्मचारी श्री.संतोष बारी यांनी कोरोना वर मात केल्याने त्यांचाही संस्थाध्यक्ष अँड.संदीप सुरेश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तत्पूर्वी अँड.संदीप सुरेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या वेळी संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांच्या सह सर्व विद्याशाखांचे प्राचार्य,उपप्राचार्य,मुख्यध्यापक,पर्यवेक्षक,रजिस्टार,विभागप्रमुख,प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोविड संदर्भात महाराष्ट्र शासन कृत नियमांचे पालन करून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संदीप भास्कर पाटील यांनी केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...
-
नंदुरबार, प्रतिनिधी : नंदुरबार शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळ बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा