Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०
Home
/
Unlabelled
/
सोयंदेव गावाचा आदर्श तालुक्यातील इतर गावांनी घ्यावा:-गटविकास अधिकारी किशोर शिंदे..!
सोयंदेव गावाचा आदर्श तालुक्यातील इतर गावांनी घ्यावा:-गटविकास अधिकारी किशोर शिंदे..!
सिंदखेड राजा तालुका प्रतिनिधी (राजे शशिकांत जाधव ) दि १५ महाराष्ट्रातील सर्व गावे स्वयंपूर्ण झाली तर देश स्वयंपूर्ण व्हायला वेळ लागणार नाही, या जाणिवेतून गावे समृद्ध करण्याचे हेतूने शासनाने वेगवेगळे पुरस्कार व योजनांच्या माध्यमातून गाव बलशाली झाली पाहिजे.
याची उपायोजना केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत सोयंदेव खैरखेड गावाने या अभियानात आपला सहभाग नोंदविला होता.त्या स्पर्धेत सिंदखेड राजा तालुक्यातील प्रथम क्रमांक सोयंदेव खैरखेड गावाने पटकावला आहे. सोयंदेव खैरखेड या गावांनी ज्या दिशेने वाटचाल केली त्या दिशेने इतर गावांनी जाणे गरजेचे आहे असे मौलिक प्रतिपादन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर शिंदे यांनी या प्रसंगी केले.
मागील तीन वर्षापासून सोयंदेव खैरखेड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आली असून गावाला स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर करण्याचे हेतूने गावातील सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व नवयुवक मंडळी सरसावली होती त्याचाच परिपाक म्हणून ह्या गावाने 100% धूरमुक्त ग्राम, शंभर टक्के हागणदारीमुक्त ग्राम, शंभर टक्के विमा ग्राम, 100% विद्युत ग्राम,संपूर्ण जनधन खाते काढली आहे.
अशा प्रकारचे काम केले आहे याच बरोबर गावातील वाईट चालीरीतींना फाटा देण्याचे काम,कन्या दिन उपक्रम, आत्महत्या होऊ नये या साठीचे काम गावकऱ्यांनी केले आहे.या सह नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून गाव गाडा स्वयंपूर्ण करण्यासाठी ज्या काय उपाययोजना करता येतील त्या करण्याचा प्रामाणिक प्रयत्न येथील गावकऱ्यांनी केला आहे.
ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गावाने आपले रूप पालटले आहे. दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून नव्या आयुधा सह शैक्षणिक परिवर्तन करण्याच्या हेतूने संपूर्ण शाळा डिजिटल करण्यात आली आहे. स्वच्छ सुंदर शाळा, प्रसन्न वातावरणात न्यायदानाचे कार्य अधिक गतीने समोर जात आहे. निकोप पिढी निर्माण करण्यासाठी शाळेला स्वयंपूर्ण करणे हे महत्त्वाचे असते. हा धागा पकडून गाव वासियांनी शाळेच्या बाबतीत प्रभावी काम केले आहे. वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून पाठपुरावा करीत निधी आपल्या गावात खेचून आणला आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून कामे करण्यात आली आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेली पाणी समस्या सोडवण्यासाठी आंदोलनात्मक पवित्र अवलंबत गावची पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली. हे सर्व होत असताना गावातील लोकांची मने साफ झाली तर गाव साफ व्हायला वेळ लागत नाही हा विचार खऱ्या अर्थाने ह्या गावातील लोकांनी सत्यात उतरविले आहे. आणि म्हणूनच या अगोदर सुद्धा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार सुद्धा सोयंदेव खैरखेड ग्रामपंचायतीने पटकावला आहे. आपल्या कामात सातत्य ठेवत असल्याने आता स्मार्ट ग्राम पुरस्काराने सुद्धा सोयंदेव खैरखेड गावाला गौरविण्यात आले आहे.
या पुरस्काराने गावकऱ्यांच्या शक्तीमध्ये निश्चितच भर पडणार आहे आज आज 15 ऑगस्ट 2020 च्या निमित्ताने covid-19 च्या पार्श्वभूमीवर छोटेखानी समारंभात या पुरस्काराचे वितरण जिजामाता सभागृह सिंदखेड राजा येथे पंचायत समितीच्या सभापती सौ नंदिनीताई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली उपसभापती सौ लता अण्णा खरात पंचायत समिती सदस्य संतोष आडे, गजानन बंगाळे,विलासराव देशमुख, अण्णा खरात, गटविकास अधिकारी किशोर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये स्मार्ट ग्रामच्या सरपंच सौ जयश्री दिपक कायंदे व सचिव आसाराम फुपाटे यांना हा पुरस्कार मानपत्र,शाल,श्रीफळ पुष्पगुच्छ व दहा लक्ष रु ची विकास कामे असे स्वरूपात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी,या गावाला यशाच्या शिखराकडे घेऊन जाण्याची कल्पकता ज्यांनी दाखविली ते ग्राम विकास चळवळीचे कार्यकर्ते प्रवीण भाऊ गीते यांनी गावाच्या प्रगतीचा आलेख कसा उंचावत गेला याबाबतची भूमिका विशद केली.याप्रसंगी विलासराव देशमुख सचिव फुपाटे,गटविकास अधिकारी किशोर शिंदे यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले स्वच्छतेच्या या वैचारिक वारीमध्ये इतरही गावाने सहभागी झाले पाहिजे असे आव्हान गटविकास अधिकारी किशोर शिंदे यांनी केले आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विस्ताराधिकारी घुगे यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा