Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२०
सीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणा पर्यंत कालवा बनवा.-खा.ओमराजे..!
परंडा (राहूल शिंदे) दि.१४ सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्याचे खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी गुरूवारी पाटंबधारे विभागाचे अधिक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, उजनी ते सीना-कोळेगाव जोड कालव्याचे काम सुरू असून ते पाणी बंगाळवाडी येथील सीना नदीच्या पात्रात येणार आहे. बंगाळवाडी, देऊळगाव, काटेवाडी, तांदुळवाडी या माळरानावरून उपसा सिंचनाद्वारे पांढरेवाडी तलावापर्यत कालवा तयार केला गेल्यास परिसरातील जवळपास आठ गावांतील ऐंशी टक्के क्षेत्र ओलीताखाली येणार आहे.
या बरोबरच या भागातील काही पाझर तलावात पाणी सोडता येणार आहे. ही योजना कार्यान्वीत झाल्यास या भागातील सिंचनाचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत उपाययोजना करण्याची मागणी खासदार राजेनिंबाळकर यांनी केली आहे.
सीना -कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी तलाव उपसा सिंचन योजना मंजूर करण्यात यावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी देऊळगावचे माजी सरपंच केशव गाढवे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (ता.१३ ) खासदार राजेनिंबाळकर यांची भेट घेऊन निवेदन देऊन केली होती. यावेळी सचिन सुर्यवंशी सर, रविंद्र गाढवे आदी उपस्थित होते.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे माजी सभापती रणजितसिंह पाटील म्हणाले, ही योजना कार्यान्वित झाल्यास या भागातील सिंचनप्रश्न मार्गी लागणार असून यातून माळरानावर हरीतक्रांती होणार आहे. खंडेश्वरवाडी प्रकल्पात देखील यामुळे पाणी येऊ शकते. या योजनेसाठी मंत्री स्तरावरून प्रयत्न करावे लागतील. यासाठी एकत्रित प्रयत्न गरजेचे आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...
-
नंदुरबार, प्रतिनिधी : नंदुरबार शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळ बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा