Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ४ जून, २०२६
Home
/
/
नंदुरबारमध्ये खळबळ : सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून अचानक गोळी सुटली; फरशीचे तुकडे लागून बँक कर्मचारी गंभीर जखमी
नंदुरबारमध्ये खळबळ : सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून अचानक गोळी सुटली; फरशीचे तुकडे लागून बँक कर्मचारी गंभीर जखमी
नंदुरबार, प्रतिनिधी : नंदुरबार शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळ बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. एटीएममध्ये रोख रक्कम भरण्यासाठी आलेल्या कॅश व्हॅनच्या सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून अचानक गोळी सुटल्याने फरशी फुटून तिचे तुकडे उडाले. या तुकड्यांमुळे बँकेचा एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत रोख रकमेचा पुरवठा करण्यासाठी कॅश व्हॅन आली होती. रोकड उतरविण्याची प्रक्रिया सुरू असताना व्हॅनच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून अचानक गोळी सुटली. सुदैवाने बंदुकीचे तोंड खालील दिशेला असल्याने मोठी दुर्घटना टळली.गोळी
फरशीवर आदळल्याने फरशीचा काही भाग फुटून त्याचे तुकडे आजूबाजूला उडाले. त्यातील काही तुकडे संजय दगाजी गायकवाड (वय ४३, रा. उमर्दे खुर्द, ता. नंदुरबार) यांच्या शरीरात घुसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.घटनेनंतर
परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून गोळी नेमकी कशी आणि कोणत्या कारणामुळे सुटली, याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
मिसफायरमागील कारणांचा शोध प्राथमिक
माहितीनुसार ही घटना निष्काळजीपणा किंवा तांत्रिक बिघाडामुळे घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिस तपासानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
आठवडाभरात दुसरी गोळीबाराची घटना
गेल्याच आठवड्यात नंदुरबार शहरालगतच्या बिलाडी शिवारात वादातून एका व्यक्तीवर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता शहरातील भरवस्तीतच बंदुकीतून गोळी सुटल्याच्या घटनेने नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एका ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा