Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०
Home
/
Unlabelled
/
श्री.एस.बी.भोई सर यांची जामनेरच्या इंदिराबाई ललवाणी हायस्कूल व ज्यु.काॕलेजच्या प्राचार्यपदी नियुक्ती...!
श्री.एस.बी.भोई सर यांची जामनेरच्या इंदिराबाई ललवाणी हायस्कूल व ज्यु.काॕलेजच्या प्राचार्यपदी नियुक्ती...!
जामनेर /प्रतिनिधी संजय सूर्यवंशी
जामनेरपुरा येथील ग्रामीण विकास तरूण मित्र मंडळ संचलित इंदिराबाई ललवाणी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी श्री.एस.बी.भोई यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे सचिव श्री. किशोर महाजन यांनी दिली.
ललवाणी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य पी.आर.वाघ यांचे निधन झाल्यामुळे प्राचार्य पद रिक्त झाले असता .ललवाणी शैक्षणिक संकुलाच्या कार्यकारी मंडळाच्या विशेष सभेत एस.बी.भोई यांची नियुक्ती करण्यात आली.भोई सर मूळचे चांगदेव येथील रहिवासी असून याच संस्थेत सुमारे तीस वर्षांपासून गणित व विज्ञान विषयाचे अध्यापन करीत आहेत .सरांचे स्मितहास्य विद्यार्थ्यांना समजून घेणे त्यामुळे
विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून भोई सरांचे नावलौकिक आहे.
ललवाणी शैक्षणिक संस्थेचे आधारस्तंभ माजी खासदार ईश्वरलाल जैन ,माजी आमदार दत्तात्रय महाजन ,संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र महाजन ,सचिव किशोर महाजन उपाध्यक्ष विनित महाजन,के.व्ही.महाजन सर,ज्येष्ठ संचालक श्रीराम महाजन ,संचालक व माजी आमदार मनीषदादा जैन ,संचालक फकिरा धनगर ,भगवान बेनाडे ,संजय महाजन ,कॉलेजचे उपप्राचार्य जे.पी.पाटील ,उपमुख्याध्यापिका सुनंदा देवकर,तसेच राजेंद्र बाविस्कर , प्रा.के.एन.मराठे ,प्रा.आर.ए. पाटील , एस .जी.अग्रवाल यांनी नवनियुक्त प्राचार्य भोई सर यांचे अभिनंदन केले.
तसेच जामनेर शहरातील भोई समाजाच्या वतीने सुद्धा सरांना अभिनंदन पर शुभेच्छा देण्यात आल्या.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा