Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १६ ऑगस्ट, २०२०

पिंपळादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कैलास गर्दे यांच्या हस्ते ध्वजारोहन..!



धुळे प्रतिनिधी- धनंजय गाळणकर
धुळे दि.१५ ऑगस्ट मोहाडी उपनगर येथील श्री.पिंपळादेवी बालमंदिर,प्रार्थमिक,
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय.मनपा शाळा क्रमांक ५६ यांच्या सयुक्त विद्यमाने माननिय श्री.विनायक बापुजी शिंदे यांच्या अध्यक्षते खाली भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.यावेळी कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेवून सामाजिक अंतर यांचे नियम पालन करून संस्थेचे संचालक मंडळाचे पदाधिकारी व सर्व शाखांचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक,शिक्षीका व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.याप्रसंगी स्वातंत्र्य दिनाचे महत्व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आर.व्ही.पाटील यांनी विषद केले.याप्रसंगी स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहन मोहाडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व आवाज न्युज चॅनेलचे संपादक श्री.कैलासजी गर्दे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.शिवाजी रामदास शिंदे,संचालक बंन्सिलाल रावन
शिंदे,श्री.एस.बी.पाटील,ताराचंद सखाराम वाघमारे,रामदास पवार,राजेंद्र दहातोंडे,रामदास नारायण गावडे,आकाश विनायक शिंदे,राकेश भामरे,प्रार्थमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री.व्हि.बी.ठाकरे,मनपा शाळा क्रमांक ५६ च्या मुख्याध्यापिका श्रीमती इंदिराताई भोसले,उपमख्याध्यापक श्री.एस.डी.बाविस्कर,पर्यव्यक्षक श्री.के.आर.सावंत,सर्व शिक्षक,शिक्षीका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री.एस.डी.बाविस्कर यांनी केले.तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.व्हि.बी.ठाकरे यांनी व्यक्त केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध