Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुक्यात कोरोना या आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना व जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ ,आमोदे गावापासून सुरवात..!
शिरपूर तालुक्यात कोरोना या आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना व जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ ,आमोदे गावापासून सुरवात..!
शिरपूर प्रतिनिधी -शिरपूर तालुका कोरोना या आजाराच्या हॉटस्पॉट ठरत असून तालुक्यात शहरी भागातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या तसेच मृत्यू दर हा चिंतेचा विषय ठरत आहे.
यासाठी याआधीच शिरपूर प्रशासनाने विविध उपाय योजना व अंमलबजावणी करून तसेच वेळोवेळी शासनाने पारित केलेले निर्णय, परिपत्रक ,सूचना, निर्देश यांचे पालन करून शहर तसेच ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाची साखळी तोडणे/ खंडित करणे यासाठी पुरेपूर प्रयत्न केले आहेत.
मात्र तरीदेखील तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता जिल्हाधिकारी सो धुळे यांनी दिनांक 18 रोजी शिरपूर येथील आढावा बैठकीत तालुक्यातील उपाययोजनांमध्ये भर करणे जनजागृती करणे यासाठी शहरात आणि ग्रामीण भागात जनजागृती कार्यक्रम राबविण्याचे मार्गदर्शन केले होते.
या आदेशान्वये तहसीलदार आबा महाजन यांनी शिरपूर तालुक्यात याबाबत जनजागृती आणि मार्गदर्शन करण्यासाठी तालुक्यातील 118 ग्रामपंचायतींवर कार्यक्रमाचे नियोजन करून दिनांक 21 ऑगस्ट 1 सप्टेंबर या कालावधीत जनजागृती व मार्गदर्शन सभांचे आयोजन केले आहे. यासाठी तालुक्यातील तहसीलदार ,नायब तहसीलदार ,बालविकास प्रकल्प अधिकारी ,गटविकास अधिकारी, शहर पोलीस निरीक्षक व अधिकारी , तालुका पोलीस स्टेशन सांगवी व थाळनेर पोलीस स्टेशन चे अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी इत्यादी अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करून याबाबत जनजागृती मार्गदर्शन करण्याचे नियोजन केले आहे. यावेळी सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य ,पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य ,ग्रामसेवक, तलाठी, प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, पोलीस पाटील ,आरोग्य सेवक, आशा वर्कर ,अंगणवाडी सेविका, कृषी सहाय्यक इत्यादी सर्व लोकांचे प्रबोधनात्मक जनजागृतीसाठी आयोजन करण्यात येत आहे.
या निमित्ताने मार्गदर्शक सुचनाच्या फलकाचे अनावरण करून आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाचा शुभारंभ तालुक्यातील आमोदे गावातून शिव मंदिर येथून करण्यात आला. यावेळी कोविड 19 च्या आजरावर प्रतिबंध करणे कामी उपयोगात येणाऱ्या सर्व सूचना जसे मास्क लावणे ,सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई करणे, वारंवार साबण अथवा सॅनिटायझर हात स्वच्छ करणे, लग्न अंत्यविधी इतर समारंभ करतेवेळी अनावश्यक गर्दी टाळणे, विनाकारण बाहेर न फिरणे, घरातील आणि बालक आणि व्यस्त व्यक्ती त्यांची काळजी घेणे,शासनाने वारंवार दिलेल्या सूचनांचे पालन करणे इत्यादीबाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित डॉक्टर प्रसन्ना कुलकर्णी, डॉक्टर पितांबर दिघोरे, डॉक्टर योगेश जाधव यांनी कोरोना आजार व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय इत्यादी बाबत मार्गदर्शन केले.
तहसीलदार शिरपूर यांनी शासन करत असलेल्या सर्व उपाययोजनांची माहिती उपलब्ध करून दिली शिवाय समाजात काही खोट्या अफवा पसरत असून लोकांचे खोटे कोरोना रिपोर्ट दाखवून, शासनाकडून निधी मिळत असल्याच्या अफवा बाबत चिंता व्यक्त केली. यात कोणत्याही प्रकारची सत्यता नसून लोकांनी यावर विश्वास न ठेवता सर्वांनी मिळून संकल्प करून शासनास मदत करून कोरोना वर मात करत शिरपूर तालुका कोरोना मुक्त करण्याच्या संकल्प व्यक्त केला.
अनेक रुग्णांना जरी कोणतेही लक्षणे आढळत नसले तरी तो आपल्या परिवारातील बालकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना तो घातक ठरू शकतो आणि अशा घटना तालुक्यात घडल्या आहेत म्हणून प्रत्येकाने जबाबदारीने वागून याविरुद्ध लढा दिला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रसंगी बोलताना अनेक चांगल्या आणि वाईट प्रसंग यांनी बोलून दाखवले. संकट मोठे आहे, अडचणी देखील मोठे आहेत मात्र या सर्व गोष्टींवर मात करत जनजागृती तून, लोकसहभागातून आपण सजग राहून कोरोना वर मात करू शकतो असा आत्मविश्वास व्यक्त करून आपण कोरोना बाधित होऊ नये, आपल्या कुटुंबापासून, गावापासून, शहरापासून ,तालुक्यापासून नवे देशापासून कोरोना दूर व्हावा यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार काशीराम पावरा यांनी तालुक्यातील लोकांनी कोरोना या आजाराला गांभीर्याने न घेतल्यामुळे त्याचा प्रसार होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेत व आपले जबाबदारीचे पालन करत वागणूक करणे गरजेचे आहे.
जर कोणी पॉझिटिव्ह आले असेल अशा व्यक्तींनी जरी लक्षणे नसले तरी, स्वतःच्या जीवासाठी ,परिवारासाठी, आणि समाज रक्षणासाठी उपचार करून घेत स्वतःला काही दिवस दूर करून त्यावर मात केली पाहिजे. याबाबत लक्षणे आढळून आल्यास तात्काळडॉक्टरांची संपर्क केला पाहिजे अन्यथा आपला जीव धोक्यात येऊ शकतो . जर या आजारापासून डॉक्टर देखील वाचू शकत नसतील तर आपण तर सामान्य माणूस आहोत आणि म्हणून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार करण्याचे काम आपले सर्वांचे आहे असे मत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमासाठी आमदार काशीराम जी पावरा, शिरपूर चे तहसीलदार आबा महाजन, शहर पोलिस स्टेशनचे एपीआय चंद्रकांत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्न कुलकर्णी, डॉ.पितांबर दिघोरे डॉ. योगेश जाधव, सरपंच सौ हर्षाली देशमुख,ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामसेवक विनोद कोळी,आरोग्य सेवक ,आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, प्राथमिक शिक्षक ,ग्रामस्थ, पंचक्रोशीतील सरपंच आणि पोलीस पाटील यावेळी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगदीश नाना देशमुख, राज देशमुख, रणजितअण्णा राजपूत,पोलीस पाटील निखिल राजपूत,उप सरपंच कल्पनाबाई पवार,सदस्य सौ लताबाई राजपूत,कल्याण राजपूत,यशपाल राजपूत, मुन्नादादा देशमुख,लालसिंग पाटील,महारु देशमुख,रवींद्र राजपूत, संजय गिरासे,पुजारी राजू राणावत,इ व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.व कोरोना मुक्त गाव करण्याचा संकल्प केला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा