Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २२ ऑगस्ट, २०२०
कृषिदूतातर्फे लसिकरण शिबिराचे आयोजन..!
इंदिरानगर वार्ताहर: महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत के.व्ही. पटेल कृषि महाविद्यालय, शहादा जिल्हा नंदुरबार येथील चतुर्थ वर्षातील कृषिदुत आशुतोष राजु देवरे याने निफाड़ तालुक्यातील वडाळी (नजीक) येथे सुरुअसलेल्या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत वडाळी , निफाड़ येथे गाय आणि म्हशींसाठी लसिकरण शिबिराचे आयोजन केले. शिबिरा मध्ये नवीन आलेल्या लांपीअस या त्वचेवरील आजाराबद्दल जनजागृती करण्यात आली. जनावरांवर या आजाराची लक्षणे कशी दिसून येतात व त्यावरील उपाययोजना काय करावी याबद्द्ल माहिती देण्यात आली. शिबिरा दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी डॉ अरुण जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.शिबिरास हरिभाऊ झाल्टे, प्रवीण झाल्टे, गणेश झाल्टे,अभिषेक सोनवने , अभिषेक मोरे , आकाश झाल्टे , तुषार कदम आदी ग्रामस्थ उपस्थित होते. त्यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी .एल. पटेल व इतर शिक्षकांचे सहकार्य मिळाले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा