Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०

जामनेर महाविद्यालयामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मदत केंद्राचे उद्घाटन..!



जामनेर प्रतिनिधी संजय सूर्यवंशी
जामनेर महाविद्यालयामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे चे मदत केंद्राचे उद्घाटन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील यांच्या हस्ते व प्राचार्य डॉक्टर शिरीष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासंबंधी फॉर्म कसा भरावा. बरेच विषय माहीत नस तात त्यामुळे विद्यार्थ्यांना फिरावे लागते.

म्हणून विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांनी प्रवेशासंबंधी काही अडचण असल्यास सदर मदत केंद्रा शी संपर्क साधावा. विद्यार्थी हितासाठी सदैव अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तत्पर आहे.सदर उद्घाटनप्रसंगी प्राध्यापक जाधव सर, अवथरे सर ,किरण पाटील सर, प्रा विजेंद्र पाटील सहशहरमंत्री कल्पेश सोनवणे, चेतन नेमाडे ,पवन बाविस्कर, आदित्य देवरे ,यश मोरे व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध