Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०
Home
/
Unlabelled
/
आरक्षण का महत्त्वाचे आहे..!रोहितभाऊ शिंगाणे...!महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भोई समाज सेना
आरक्षण का महत्त्वाचे आहे..!रोहितभाऊ शिंगाणे...!महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भोई समाज सेना
आरक्षण असले तरच प्रगती शक्य आहे हे विसरून चालणार नाही... आपल्या समाजातील अनेक मान्यवरांना, त्यात शासकीय दरबारी मोठ्या हुद्द्यावर आहेत त्यांना या आरक्षणाचे महत्त्व माहिती असेलच... बालवाडी च्या एडमिशन पासून फी मध्ये काही अंशी सुट मिळण्यापासून ते पदवी-पदव्युत्तर मध्ये ऍडमिशन मिळण्यासाठी काही जागा आरक्षित असतात आणि फी मध्ये देखील सूट मिळते...
पदव्युत्तर डिग्रीमध्ये पेट्रोलियम टेक्नॉलॉजी सारख्या मोठ्या कोर्समध्ये,पुणे येथील वाडिया कॉलेजमध्ये,भारतातून फक्त 14 मुलांना ऍडमिशन असतांना,मी NT B मध्ये असल्यानेच मला आरक्षण असलेल्या त्या एका जागेवर ऍडमिशन मिळाले आणि माझी प्रगती झाली. मास्टर ऑफ सायन्स इन पेट्रोलियम टेक्नॉलॉजी हा कोर्स संपेपर्यंत, मी सायकलवर फिरत असलेला माणूस, नंतर शिक्षणाच्या जोरावर फ्रान्समधील कंपनीत नोकरीला लागलो आणि चांगल्या हुद्यापर्यंत स्वकर्तृत्वावर पोहोचलो. त्यानंतर प्रगती थांबली नाही आणि फोर व्हीलर पर्यंतचा प्रवास सुरू झाला.
माझ्यासारखेच अनेक तरुण आहेत ज्यांनी शिक्षणात आरक्षणाचा फायदा घेतला तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये देखील आरक्षणाचा फायदा अनेकांना मिळालेला आहे.
जे जे सरकारी नोकर आहेत त्यांना विचारून बघा की आरक्षणाचा नेमका फायदा काय असतो. मी जरी सरकारी नोकरीत नसलो तरीही शिक्षणात मात्र मला आरक्षणाचा फायदा मिळाला. काहीअंशी मला याच एनटी ब कॅटेगरी मुळे फी मध्ये सूट तसेच शिक्षणाकरिता काही योजनांमधून पैसाही मिळाला.
आरक्षणाचे महत्त्व फक्त त्यांनाच कळते ज्यांनी आरक्षणाची चव चाखली आहे किंवा आरक्षणाचा फायदा घेतलेला आहे... इंजिनीअरिंग आणि मेडिकल कॉलेजेस मध्ये देखील आरक्षणाचा फायदा घेऊन आपले काही समाज बांधव इंजिनीयर आणि डॉक्टर झालेले आहेत. मोठ-मोठ्या युनिव्हर्सिटी मध्ये सुद्धा ॲडमिशन साठी काही जागा आरक्षित असतात तेथेही आपल्या काही लोकांचा फायदा झालेला आहे.
आरक्षणाचे 2 प्रकार असतात. उभे व आडवे (समांतर) आरक्षण. आपण त्याला सहज लक्षात येते म्हणून व्हर्टिकल आरक्षण व हॉरिझेंटल आरक्षण असे म्हणतो.
विविध जातींना मिळणारे आरक्षण हे उभे (व्हर्टिकल ) आरक्षण आहे,म्हणजे समजा या वर्षी MPSC च्या परीक्षेत उपजिल्हाधिकारी पदाच्या १०० जागा आहेत याचे विविध समाज प्रवर्गासाठी जे विभाजन होईल ते व्हर्टिकल आरक्षण होय. उदा वरील १०० जागा मधील १५ जागा अनुसूचित जाती, ७ जागा अनुसूचित जमाती ,१७ टक्के इतर मागासवर्ग व बाकी इतर प्रवर्ग.
समांतर / हॉरिझेंटल आरक्षण म्हणजे विविध प्रवर्गात जागा वाटप झाल्यानंतर त्या त्या प्रवर्गातील महिला, खेळाडू , दिवांग्य यांचे आरक्षण विभाजन होय. अनुसूचित प्रवर्गातील १५ जागांमध्ये महिलांना ३० टक्के आरक्षण (०५ जागा ) आहे, खेळाडूंना याना ३ टक्के (आरक्षण आहे, याच १५ जागांमध्ये दिव्यांग याना ३ टक्के आरक्षण आहे यालाच समांतर आरक्षण म्हणतात . आरक्षणातील आरक्षण म्हणजे समांतर आरक्षण होय.
आरक्षणामुळे समाजातील अनेक बंधू आणि भगिनी या शिपाई पासून ते पोलिस मास्तर, गुरुजी , प्रोफेसर प्रिन्सिपल, इंजिनियर , डॉक्टर , तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी आणि मंत्रालयात काही राखीव जागांवर देखील आरक्षणामुळे नोकरीला लागलेले आहेत.
अर्थातच बालवाडीपासून, शाळा, काॅलेज फीमध्ये सूट मिळण्यापासून, योजना मधून शिक्षणासाठी खर्च मिळण्यापासून तर शासकीय-निमशासकीय , रेल्वे बोर्ड आणि मंत्रालयापर्यंत असलेल्या विविध शासकीय नोकऱ्यांमध्ये तसेच डॉक्टर इंजिनियर सारख्या अतिमहत्त्वाच्या जागांवर देखील याच आरक्षणामुळे फायदा झालेला आहे.
अर्थातच याच कारणामुळे ब्राह्मण , मराठा समाजासारखे मोठे पुढारलेले समाज देखील आता आरक्षण मागायला लागलेले आहेत.
या आरक्षणाचे महत्त्व ज्यांना कळाले नाही असा समाज निश्चितच मागासलेला राहील याबाबत शंका नाही. आणि या आरक्षणाचे महत्त्व आपल्या समाजाला अजूनही कळलेले नाही याचा खेद आणि खंतही मला वाटते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा