Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२०
Home
/
Unlabelled
/
शिरपुर येथील श्रीरामचंद्र येशी यांची धुळे जिल्हाध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र प्रभारी पदी तर सौ.हेमलता येशी यांची धुळे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष पदी नियुक्ती..!
शिरपुर येथील श्रीरामचंद्र येशी यांची धुळे जिल्हाध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र प्रभारी पदी तर सौ.हेमलता येशी यांची धुळे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष पदी नियुक्ती..!
शिरपूर, ता. 10/8/20 शिरपुर शहर नाभिक दुकानदार संघटनेचे शहराध्यक्ष रामचंद्र रतीलाल येशी यांची नवी दिल्ली मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्टच्या धुळे जिल्हाध्यक्ष पदी तर हेमलता रामचंद्र येशी यांची धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्षा पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री.दिनेश गुप्ता यांनी ही नियुक्ती केली आहे.
संपूर्ण भारतात असलेल्या नवी दिल्ली येथील मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्टच्या धुळे जिल्ह्याची व उत्तर महाराष्ट्र प्रभारी पदाची जबाबदारी शिरपूर येथिल रामचंद्र येशी यांना देण्यात आली आहे. तर हेमलता रामचंद्र येशी यांना धुळे जिल्हा ग्रामीण भागाची जबाबदारी देण्यात आली.
या बाबत राष्ट्रीय संस्थापक कार्याध्यक्ष तथा महासचिव दिनेश गुप्ता, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ आशिष परमार, कोषाध्यक्ष डॉ जितेंद्र गुप्ता, वित्तीय सल्लागार नितेश सिंह, जगन्नाथ पाटील, दिनेश यादव, सचिव उदयलाल गुप्ता, उपसचिव उमेश शिंदे, संतोष भोईर, डॉ चंदन शर्मा, रवी गुप्ता, महाराष्ट्र प्रदेश महिला कार्याध्यक्ष शोभाताई जाधव, शिरपूर जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चे विकास सेन यांनी अभिनंदन केले
जिल्हाध्यक्ष रामचंद्र येशी यांनी
धुळे जिल्ह्या संघटक पदी श्री राजेन्द्र कोळी शिरपूर तालुकाध्यक्ष पदी श्री जीवन छगन चौधरी तर शिरपुर तालुका उपाध्यक्ष पदी श्री योगेंद्र हिलाल सोनवणे व शिरपुर शहर अध्यक्ष पदी श्री लक्ष्मीकांत वारुडे यांची नियुक्ती केली आहे.
रामचंद्र येशी यांनी संघटनेच्या पदाधिकारी सोबत कोरोनाच्या संचारबंदी काळात शिरपूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सेवाभावी कार्य केले. गरजवंत सामाज बांधवांना अपेक्षित मदत पोहचवली, परराज्यात पायी जाणाऱ्या अनेक लोकांना बिजासन घाटात मदत केली.
त्यांच्या या कामाची दखल अनेक सेवाभावी संस्थानी घेऊन त्यांना प्रमाणपत्र व पुरस्कार देऊन यथोचित सत्कार केला. यात स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट सातारा, साई निर्मल फाउंडेशन भुसावळ, भारतीय किसान युनियन लोकशक्ती हरियाणा, कौशल विकास आणि उद्यमिता मंत्रालय नई दिल्ली, आयुष संजीवनी, केंद्रीय सतर्कता आयोग नई दिल्ली, सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश, राष्ट्रीय हिंदू संघ अशा विविध संघटनानी त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे.
श्री येशी यांना धुळे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्र प्रभारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या निवडी बद्दल सर्व स्तरातून श्री येशी व त्यांच्या पदाधिकाऱयांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...
-
नंदुरबार, प्रतिनिधी : नंदुरबार शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळ बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा