Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०
Home
/
Unlabelled
/
कोरोना काळात गणपती उत्सव रक्तदान करुन साजरा करा.पोलीस अधिक्षक,डॉ दिलीप पाटील भुजबळ..!
कोरोना काळात गणपती उत्सव रक्तदान करुन साजरा करा.पोलीस अधिक्षक,डॉ दिलीप पाटील भुजबळ..!
शेगांव(शहरं प्रतिनिधी उमेश राजगुरे)शांतता व सलोख्यात उत्सव साजरे करण्याची परंपरा शेगांव शहरात आहे. शेगांवमधे सर्व महापुरुषांची जयंती व विविध उत्सव शांततेत साजरे केले जातात.शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून शेगांवकऱ्यांनी,मंडळांनी गणपती उत्सव,मोहरम शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून साजरा करावे व पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी केले. वर्धमान भवन याठिकाणी शांतता समिती व विविध उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. यामधे आगामी येणारे गणेश उत्सव, मोहरम साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. गणपती उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून आरोग्याकडे लक्ष ठेवून कोरोना काळात रक्तदान करुन उत्सव साजरा करा असे आवाहन करण्यात आले.
यासंर्भात शांतता समितीच्या बैठकीत उपस्थित सर्वांना कोरोना परिस्थितीत उत्सव साजरा करण्या बद्दल जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नियम लागू करण्यात आले आहे त्या नियमांचे पीडीएफ फाईल सर्वांना देण्यात आली. या बैठकीमध्ये पोलीस अधिकारी,गणपती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य व शेगांव येथील अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार माजी मंत्री डॉ संजय कुटे पत्रकार शेगांव शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते,राजकीय कार्यकर्ते,पंचायत समितीचे सदस्य, ग्रा. पं सदस्य, पोलीस पाटील यांसह विविध उत्सव मंडळांचे सदस्य उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा