Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०
शेगाव नगरपालिकेचा स्वच्छ सर्वेक्षणात समावेश..!
शेगाव (शहर प्रतिनिधी उमेश राजगुरे)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मिळणार ऑनलाईन पुरस्कार शेगाव शहरात स्वच्छ संरक्षण 2020 ची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे शेगाव नगरपालिकेने राष्ट्रीय पातळीवर यादी स्थान पटकाविले आहे.
अमरावती विभागातून एकमेव शेगाव नगरपालिकेचा त्यामध्ये समावेश झाल्याचे पत्र शासनाच्या गृह विभागाकडून नगर पालिकेला प्राप्त झाले आहे.
नगरपालिकेने गेल्या चार वर्षापासून शेगावात स्वच्छता ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. शहरात विकासात्मक बाबी घडल्या तसेच शहराचे रूप पालटले आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून वेळोवेळी शहरात स्वच्छता राखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत.
त्यामुळे तपासणीकरिता आलेल्या समितीचा अहवाल सकारात्मक आला.
राष्ट्रीय पातळीवर गुणांक यादीत शेगाव नगरपालिका अमरावती विभागातून प्रथम आली आहे. त्यामुळे शेगाव शहराच्या नावलौकिकात भर पडली.
स्वच्छ संरक्षण 2020 अमरावती विभागातून शेगाव नगरपालिका एकमेव असल्याने निश्चितच शहराच्या लौकिकात मध्ये भर पडली.असे जळगाव मतदारसंघातील आमदार माजी पालकमंत्री डॉ संजय कुटे यांनी न्यूज तरुण गर्जना सी बोलताना सांगितले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा