Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विद्यार्थाना शैक्षणिक साहित्याचे वाटप...!
कोरोनाच्या महामारीमुळे सर्व क्षेत्राला याचा फटका बसला असून ज्यात शिक्षण क्षेत्र सुद्धा आहे, प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या नसल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे विद्यार्थ्यांचे प्रवेश होत आहेत अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे त्यामुळे आर्थिक दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची कमतरता भासू नये म्हणून आरंभ संस्था सचिव श्रमिकजी पोतदार यांनी संस्थेचे सचिव श्रमिक पोतदार, कोषाध्यक्ष सागरसिंह हजारे व प्रसिद्धी प्रमुख आयुब शेख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत गरीब व गरजू विद्यार्थाना शिक्षणासाठी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता. इयत्ता 10 वी मध्ये शिक्षण घेणारे पाच विध्यार्थी व 5-9 वी या वर्गातील पाच विध्यार्थी अश्या एकूण 10 अत्यंत गरीब विद्यार्थ्यांचं वर्षभरातील संपूर्ण शैक्षणीक मदत करण्यात येणार आहे.
आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मागील वर्षी ही शिक्षणासाठी दत्तक घेतलेले सर्व विद्यार्थी विशेष गुणासह उत्तीर्ण झालेले आहेत हीच परंपरा पुढे ठेवत आज संस्थेच्या वतीने शिक्षणासाठी दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांना आज स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून शिक्षक जितेंद्र मोरखंडीकर, दौलतराव खाटमोडे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच त्यांच्या पालकांना संस्थेच्या वतीने विद्यार्थी दत्तक घेतल्याचे पत्र देऊन आपल्या मुलाचा शिक्षणाचा खर्च ज्यात वही, पेन, रजिस्टर, कंपास, परीक्षा शुल्क आदी खर्च संस्था करणार असल्याचे सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राहुल हजारे, उपाध्यक्ष विशाल डुकरे, सचिव श्रमिक पोतदार, कोषाध्यक्ष सागर हजारे, प्रसिद्धी प्रमुख आयुब शेख, पप्पू पाटील, प्रशांत जोशी, कैलास घाटे, सुजय बिस्वास आदी उपस्थित होते.
दत्तक विद्यार्थी - 2020 खलील प्रमाणे
अंजनी प्रशाला नळदुर्ग
1) भाग्यलक्ष्मी लक्ष्मीकांत आकुसखाने ई. 10 वी
2) सारिका लक्ष्मण निर्मळे ई. 10 वी
3) अंबिका बालाजी ठाकूर 8 वी
जिप प्रशाला माऊली नगर
1) अजय पप्पू कांबळे 9 वी
मोबाईल - 8767719737
2) मुजावर आसेफा चाँद 10 वी
मोबाईल - 8459992863
नॅशनल माध्यमिक मराठी शाळा नळदुर्ग.
1) कांबळे अभिषेक मलकप्पा इ. 10 वी
मोबाईल - 90497 85639
2) शेख सानिया शफिक इ.10वी
मोबाईल - 7666208892
जि प कन्या प्रशाला नळदुर्ग
1) शिवानी बालाजी शिंदे 8 वी
2) कु. शेख महेक अजमोदिदन ई.8 वी
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...
-
नंदुरबार, प्रतिनिधी : नंदुरबार शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळ बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा