Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२०
दुसरबीड येथे कोरोनाची लागण एक रुग्न पॉझिटिव्ह अकरा संपर्कात ?
सिंदखेड राजा तालुका प्रतिनिधी
(राजे शशिकांत जाधव ) सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथे नुकतेच कोरोनाची लागण झाली असून एक पॉझिटिव असून त्यांच्या संपर्कातील 11व्यक्ती असून त्यांना पुढील तपासणीसाठी सिंदखेड राजा येथे पाठवण्यात आले आहे.
येथील एक व्यापारी बायपास सर्जरी साठी औरंगाबाद येथील रुग्णालयात गेले होते त्यासाठी त्यांच्या सर्व चाचण्या घेण्यात आल्या व त्यासोबत त्यांचे स्वप चाचणी देखील घेतली व त्यांना घरी पाठवण्यत आले होते. त्यानंतर दिनांक 10 रोजी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव आला असून औरंगाबाद येथून सिंदखेड राजा येथे यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे कळविण्यात आले.त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये उपचारार्थे दाखल केले.
या कालावधीमध्ये त्यांच्या संपर्कात अजून अकरा व्यक्ती आल्या होत्या त्या अकरा व्यक्तींना सिंदखेड राजा येथील आरोग्य केंद्रात चाचणीसाठी पाठविण्यात आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले.
त्यांना रवाना करण्यासाठी पोलिस प्रशासन महसूल विभाग ग्रामपंचायत तसेच पोलीस पाटील व आरोग्य विभाग सर्व उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...
-
नंदुरबार, प्रतिनिधी : नंदुरबार शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळ बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा