Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२०
गव्हाणे फाट्यावर पिकअप वाहनाचा अपघात, ३ मजूर ठार..!
सोनगिर प्रतिनिधी:धुळ्याच्या दिशेने मजूर घेऊन येणाऱ्या पिकअप वाहनाचा अचानक टायर फुटला यामुळे पिकअप वाहन उलटल्याने अपघात झाला़ यात २ ते ३ मजुरांचा जागीच मृत्यू झाला़ तर, पिकअप वाहनात असलेले ३० ते ३५ मजूर जखमी झाले आहेत मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिंदखेडा तालुक्यातील गव्हाणे फाट्यावर सकाळी अपघात झाला अपघातानंतर महामार्गावरुन वावरणा या अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली प्रचंड आक्रोश यावेळी झाला़.
जखमी आणि मृतांना पिकअप वाहनाच्या बाहेर काढण्यात आले़ नरडाणा आणि सोनगीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले या अपघातामुळे बराच वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती़ घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संपादकीय :- राज्यात गाजत असलेल्या कथित शालार्थ आयडी प्रकरणाने आता केवळ काही व्यक्ती किंवा संस्थांपुरता मर्यादित प्रश्न राहिलेला नाही. उलट, य...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा