Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

दार उघड उद्धवा दार उघड...!सर्व मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात यावी म्हणून जामनेर मध्ये भाजपाच्या वतीने सोनेश्वर महादेव मंदिरात घंटानाद...!


    
जामनेर(प्रतिनिधी) संजय सूर्यवंशी
जामनेर शहरांसह तालुक्यातील सर्व देवस्थाने भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात यावीत या मांगणीसाठी राज्यभरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने तसेच विविध धार्मिक संघटनांकडून मंदिराच्या बाहेर घंटानाद आंदोलन करण्यात आले. 

त्यात जामनेर येथे गिताधाम सोमेश्वर महादेव मंदिर येथे भाजपच्या वतीने सुद्धा घंटानाद आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर म्हणाले की,केंद्र सरकारने देवस्थाने,मंदिरे सुरू करण्याबाबत चे केंद्र सरकारचे परिपत्रक जारी करून देशभरातील प्रमुख देवस्थाने सुरू करण्यात आली असून महाराष्ट्रातील मंदिरे व देवस्थाने सुद्धा सुरू करण्यात यावी.

अशी मागणी राज्यसरकार कडे केली आहे.तरी राज्य सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे.म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीने घंटानाद आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला आहे. व लवकरात लवकर प्रार्थना स्थळ व मंदिरे उघडावी ही मागणी करीत आहे. 

यावेळी गटनेते प्रशांत भोंडे,जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील,नगरसेवक महेंद्र बाविस्कर, सुहास पाटील,सरचिटणीस रविंद्र झाल्टे,सुधाकर माळी,सुभाष पवार, कैलास पालवे,विलास हिवराळे,विजय शिरसाठ आदी यावेळी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध