Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०
श्रीराम मॅक्रो व्हिजन ॲकेडमी तर्फे व्हर्च्युअल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन..!
रावेर प्रतिनिधी श्रीराम मॅक्रो व्हिजन ॲकेडमी तर्फे व्हर्च्युअल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन दिनांक 26 ऑगस्ट 2020 ते 29 ऑगस्ट 2020 दरम्यान करण्यात आले. सध्याच्या कोरोनाच्या जागतीलक संकट काळात सर्वच व्यवहार बंद आहेत.
त्याचप्रमाणे बरेचसे व्यक्ती कमी अधिक प्रमाणात धावपळीच्या जीवनात चिंता, ताण, तणावाला सामोरे जात आहेत. त्याचप्रमाणे मानवी शरीर नेहमी तंदरूस्त व्याधी मुक्त ठेवण्याकरीता, धावणे, चालणे आवश्यक आहे.
त्यासाठ या गोष्टीचे महत्व पटवून देण्यासाठी धावण्याला, चालण्याला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने फिट इंडिया फ्रिडम रन हा उपक्रम राबवत आहे. धावणे, चालणे हे मानवी शरीराचे सर्वात मोठे स्वातंत्र्य आहे. त्याची उत्कृष्ठ व्यायामामध्ये गणना होते. नागरिकांनी या क्रिया नियमितपणे कराव्यात यासाठी त्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी व त्यांचा लठ्ठपणा, आळस, तणाव, चिंता, बी पी, डायबिटीस या सारख्या आजारातून मुक्तता करण्यासाठी केंद्र शासनाच्या युवा व खेल मंत्रालयाने हा उपक्रम राबविला आहे. त्याकरिता शाळेत श्रीराम स्टेप अप रन चे आयोजन करण्यात आले.
संस्थाध्यक्ष श्रीराम पाटील यांचा 26 ऑगस्ट हा वाढदिवस असल्याने ते औचित्य साधून वाढदिवसा निमित्त या व्हर्च्युअल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 26 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी फेसबूक लाईव्ह च्या माध्यमातून संस्थाध्यक्ष श्रीराम पाटील यांनी स्पर्धेस शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेचे सचिव स्वप्निल पाटील, सहसचिव प्रमोद पाटील, खजिनदार ॲड प्रविण पासपोहे, उपाध्यक्ष विजय गोटीवाले यांनी ही कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेचे समापन दिनांक 29 ऑगस्ट 2020 रोजी राष्ट्रीय खेळ दिवस तसेच हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांची जयंती निमित्त त्यांना आदरांजली म्हणून स्पर्धेचा समारोप करण्यात येईल. स्पर्धेत एकूण 300 च्या वर स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला आहे. यात पुणे, मुंबई, जळगांव, भुसावळ, नाशिक तसेच रावेर तालुक्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे. साकेगांव येथील डॉ. दिपक राज पाटील आणि डॉ. कैलास ठाकरे यांसह पोलिस, होमगार्ड, विद्यार्थी, पालक, आजी, आजोबा यांनी ही आवर्जुन सहभाग घेतला आहे.
शाळेच्या प्रशासन विभागातर्फे वरिल स्पर्धेचे नियोजन करण्यात आले असून या स्पर्धेत सर्व सहभागींना फिट इंडिया फ्रिडम रन यांच्याद्वारे ई प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा