Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ३ ऑगस्ट, २०२०
कांडवेल शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेना..!आ.चंद्रकांत पाटील आले धावून...!
प्रतिनिधी रावेर तालुक्यातील कांडवेल येथील शेतकऱ्यांनी आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांची भेट घेतली असता सदर कांडवेल-चांगदेव शेत रस्त्याची वर्षभरापासून अत्यंत खराब वाईट अवस्था झाली आहे.व मोठं-मोठे पडलेले आहे व केळी इतर माल वाहतूक करण्यास शेतकरी यांना मोठा प्रमाणात त्रास होत आहे.
बाबत समस्या मांडली असता तो करून देऊ असा शब्द दिला होता.आज तो कामाच्या स्वरूपातुन खऱ्या अर्थाने पूर्ण होतांना दिसत आहे..व त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांना माल वाहतूक करण्यास अडचण येऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपात आमदार चंदू भाऊंनी त्यांच्या स्वखर्चाने व ट्रॅक्टर च्या साह्याने खडी,गोटे टाकण्यास सुरवात केली.
आ.चंद्रकांत भाऊंच्या मार्गदर्शनाने-जेष्ठ शिवसैनिक छोटू पाटील,राहुल पाटील-उपसरपंच कांडवेल,यांनी स्वतः उभे राहून ट्रॅक्टर च्या साह्याने रस्ता व शेतकरी-देविदास वाघ,शंकर पाटील,जानराव पाटील,युवराज पाचपोळे, रतन पाटील,राजकुमार पाटील,सुभाष पाटील.रेम्भोटा यांच्या उपस्थितीत हे करून घेतला.सर्व गावकऱ्यांनी आमदार साहेबांचे आभार मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संपादकीय :- राज्यात गाजत असलेल्या कथित शालार्थ आयडी प्रकरणाने आता केवळ काही व्यक्ती किंवा संस्थांपुरता मर्यादित प्रश्न राहिलेला नाही. उलट, य...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा