Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२०

स्वर्गीय डॉक्टर मधुकर आण्णांच्या स्मृतीस उजाळा देऊन अण्णांना माझी आदरांजली श्रद्धांजली....!



लहानपणापासून आई वडील काका,काकू आत्या ,यांच्या संस्कारांनी लहानाचे मोठे झाले. त्यांनी त्याकाळात म्हणजे 55 ते 60 वर्षांपूर्वी डॉक्टर एम.बी.बी.एस ही पदवी मिळवली, एवढी मोठी पदवीचे शिक्षण घेऊन अण्णांनी कुठेही तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी हॉस्पिटल टाकले असते. 

पैसा होता पदवी होती त्या काळात शहरांमध्ये एमबीबीएस लोकांची अत्यंत गरज होती अशा परिस्थितीत केवळ अण्णांनी आपले आई वडील काकू आत्या अशा म्हाताऱ्या व्यक्तींचा सांभाळ करण्यासाठी खेड्यातच व्यवसाय करण्याचे ठरविले .अण्णा सांगायचे मी खेड्यात व्यवसाय सुरू करून सर्व जीवन खेड्यातच काढले त्या कार्याला मला साथ दिली ती तुमच्या मावशीने ! मोठ्या श्रीमंताची मोठ्या गावाकडे शहराकडे वाढलेली तुमच्या मावशीने मला कधीही खेड्यात न राहता शहरात चला ,असे सांगितले नाही.  

त्यांनी माझा व माझ्या चारही म्हातारे आई वडील काका आत्यांचा चांगल्या पद्धतीने सांभाळ केला. एवढेच नाही तर अण्णांनी त्यांच्या भाच्यांचे शिक्षणही गणपुर ला केले की जे आज उच्चशिक्षित व खूप मोठे उद्योजक असल्याचे अण्णा  गर्वाने व अभिमानाने सांगत असत. अण्णा सांगायचे गावात कै. दगा दादा हेच माझे प्रेरणादायी व्यक्ति होते व्यवहारात मी त्यांचीच प्रेरणा घेतो त्यांनीही आपल्या नातवांना व मुलीच्या नातवंडांना गणपूर ला  शिक्षण देऊन नोकऱ्या व व्यवसायांना लावले. 

जशी तुमची मावशी शहरातून येऊन घरातील म्हाताऱ्या परिवारांची सेवा करण्यासाठी खेड्यातच संसार करीत आहे, तसीच विजू आप्पांची पत्नी त्या सून बाईसुद्धा शहरात वाढलेली उच्चशिक्षित असून केवळ परिवारातील म्हाताऱ्या लोकांची  सेवा करण्यासाठी खेड्यातच संसार करीत असल्याचे अण्णा आवर्जून आम्हाला सांगत होते जेणेकरून तशा संस्काराची देवाण-घेवाण होत जावी .अण्णांचे व्यक्तिमत्व माझ्यासाठी व माझ्या परिवारा साठी व व मित्र परीवारासाठी प्रेरणादायी होते भाऊ असो , भाऊ जाई असो, मुलगा असो कि सून असो, प्रत्येकाला अहो काहो असे मानसन्मान देऊन बोलण्याचे संस्कार आमच्या आठवणीतील एक मोठा भाग आहे.

गावातील शाळेत प्रत्येक शैक्षणिक कार्यक्रमाला अण्णांची आवर्जून हजेरी असायची गावातील प्रत्येक मुलाने चांगले शिक्षण घेऊन गावाचे नाव लौकीक वाढवावा ही अण्णांची अपेक्षा .! प्रत्येकाच्या सुखदुःखात अण्णांची हजेरी असायची गावात झालेल्या वृद्धापकाळाने किंवा अल्पशा दीर्घ आजाराने किंवा दुर्दैवी घटनेने झालेल्या घटनांच्या प्रत्येक मृतदेहाचे चरण स्पर्श करून श्रद्धांजली देत होते.

अण्णांनी दिलेली रुग्णसेवा म्हणजे खूपच खडतर...! गणपुर मराठे भवाळे गलंगी तोंदे सोनबर्डी अनेर डॅम हिसाळे तरडी बबळाज अशा गणपुर परिसरातील गावांना राजदूत मोटर सायकल ने रात्री-अपरात्री रुग्णसेवा दिली. अशी सेवा देणे ही साधी गोष्ट नव्हती एवढी मेहनतीमुळे अण्णांचे गुडघे निकामी झाले अण्णांचे गुडघ्यांचे ऑपरेशन केले त्या दिवसापासून ते आज पर्यंत गावात सेवा देत होते ते सांगायचे मी दवाखाना बंद केला असता, परंतु ज्या लोकांचा माझ्यावर देवा इतका विश्वास आहे तर त्या लोकांची सेवा मला करायचे आहे तसं कदाचित माझ्या नशिबात लिहिलं असेल.

अण्णा म्हणजे एक स्पष्ट बोलणारे व्यक्ती.. राग येईन तेना घर राहीन.! पण मी स्पष्ट बोलतो ,असे अण्णा सांगायचे. त्यांनी कोणाशी वाद किंवा व्यवसायातही स्पर्धा केली नाही. वाद घालणाऱ्या माणसाला ते सांगायचे.. तू मोठा बापना, मी धाकला बापना भाऊ ..! म्हणजे कुठेही नम्रतेने लागले. अण्णा धार्मिक विचारांचे होते आयुष्यभरात जेवढ्या पौर्णिमा आल्या असतील ,तेवढ्या पोर्णिमांची  देवपूजा अण्णांनी जाळीचा देव व कनाशी अशा धार्मिक स्थळांवर जाऊन केल्या. 

अण्णांनी देवावर श्रद्धा ठेवली पण अंधश्रद्धा ठेवली नाही अण्णांकडे प्रत्येक वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी होते जणू जन्माष्टमीच्या दिवशी अण्णांकडे दिवाळीच आहे भगवान कृष्णांचा जन्माचा सोहळा मोठ्या आनंदात साजरा करायचे. असे आमचे प्रेरणादायी अण्णा मात्र आज आमच्यात नाही अण्णांचे आकस्मित जाण्याने जेवढे दुःख मावशींना गोपाल दादा सुनेला नातवंडांना मुलींना झाले असेल तेवढे दुःख आम्हाला मित्रपरिवाराला गावकऱ्यांना झाले आहे. अण्णांच्या मृतात्म्यास चिरशांती लाभो परमेश्वर त्यांच्या परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रभू चरणी प्रार्थना...!
   
शोकाकुल.. संजय पाटील मृत्युंजय मेडिकल स्टोअर्स व गणपुर व परिसरातील वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स व मित्रपरिवार सर्व ग्रामस्थ व व चोपडा तालुका डॉक्टर्स असोसिएशन चोपडा तालुका औषधी विक्रेता संघटना...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध