Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०
Home
/
Unlabelled
/
भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा रावेर तालुका तर्फे राज्यव्यापी घंटानाद आंदोलन....!
भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा रावेर तालुका तर्फे राज्यव्यापी घंटानाद आंदोलन....!
प्रतिनिधी रावेर अजीज शेख रावेर
देवस्थाने,मंदिरे सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजपातर्फे आध्यात्मिक समन्वयक आघाडीतर्फे राज्यभरात आज आंदोलन करण्यात आले.
राज्यातील सत्ताधारी आघाडी सरकारने भक्तांच्या भावना जाणीवपूर्वक लक्षात न घेता केंद्र सरकारने दि.४ जून २०२० रोजी नियमावलीसह परिपत्रकही जारी केले तरी, अजून ही राज्यातील देवस्थाने बंदच ठेवली आहेत.
मंदिरे सुरू करा या मागणी करीता महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संघटना , धर्मचार्य आणि प्रमुख देवस्थाने एकत्र येऊन शहरातील मंदिरे उघडे करा या मागणीसाठी राज्य सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. आज दि. २९ ऑगस्ट २०२० रोजी स. ११ वाजता. ओंकारेश्वर महादेव मंदिर तामसवाडी ता.रावेर. येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले. देवस्थाने भक्तांसाठी खुले करा.
असा ईशारा राज्य सरकारला देण्यासाठी राज्यभर दार उघड उध्दवा दार उघड मंदिराचे अशी हाक देऊन घंटानाद आंदोलन करण्यात आले.
तसेच धुळे येथे अ.भा.वि.प.च्या विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्त्ये पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना फि माफीचे निवेदन देतांना पालक मंत्र्यासमोर पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठी हल्ला केला त्याचा निषेध व्यक्त करुन रावेर तहसिलदार उषाराणी देवगुणे यांना निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी भा.ज.पा ता.अध्यक्ष राजन लासुरकर, उपाध्यक्ष पद्माकर महाजन, पं.स.सभापती जितेंद्र पाटील, उपसभापती जुम्मा तडवी, कृ.उ.बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, पं.स.गटनेते प्रकाश महाजन (पी.के.) सरचिटणीस सी.एस.पाटील, भा.यु.मो.अध्यक्ष महेंद्र पाटील, भा.यु.मो.उपाध्यक्ष अमोल पाटील, ता.सरचिटणीस खेमचंद्र धांडे,मा.कृ. उ. बा. स. उपसभापती दुर्गादास पाटील, हरलाल कोळी, संदीप सावळे, दिलीप पाटील, मनोज श्रावक, सरपंच प्रमोद पाटील, नगिनदास चौधरी, वसंत महाजन, माधव चौधरी, विनोद कोळी, पंकज चौधरी, व कार्यकर्त्ये उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा