Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २३ ऑगस्ट, २०२०
Home
/
Unlabelled
/
गणपती बाप्पा मोरया। मानवतेला जगवू या।।... डॉ मिलिंद भोई, विश्वस्त विघ्नहर्ता न्यास पुणे पोलिस..!
गणपती बाप्पा मोरया। मानवतेला जगवू या।।... डॉ मिलिंद भोई, विश्वस्त विघ्नहर्ता न्यास पुणे पोलिस..!
पुणे प्रतिनिधी:मनुष्य हा उत्सव प्रिय आहे त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोणाचे सावट असले तरी तो सर्वत्र साजरा होणार आहे असे असले तरी इतर वर्षीचा गणेशोत्सवाचा जल्लोष, मंगलमय वातावरण,आनंद आपणास पाहायला मिळणार नाही हे निश्चित..! कोरोना या जागतिक महामारीने सर्व क्षेत्रात परिणाम झाला आहे. याचा फटका यंदाच्या गणेशोत्सवाला देखील बसलाय. श्रीगणेशाचे आगमन भाद्रपद महिन्यात होत असले तरी त्यांची पूर्वतयारी खूप आधीपासूनच होत असते.
तिच्या मूर्तीपासून ते देखावा, सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम, विद्युत रोषणाई आदीबाबत ही तयारी सुरु असते. सध्याचे चित्र मात्र काहीसे वेगळे आहे. मार्च २०२० पासून कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेले लाँकडाऊन, विस्कळीत झालेले जनजीवन आणि व्यवहार यामुळे गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीला ही फार उशिरा सुरुवात झाली पण हार मानेल तो माणूस कसला...!!! कोरोणाचे हे महासंकट झेलत सर्वत्र गणेशाच्या आगमनाची जय्यत तयारी झाली आहे. गणपती बाप्पा विघ्नहरण करणारा आहे, सुख प्रदान करणारा आहे या बाप्पाला आता आपण या उत्सवाच्या निमित्ताने साकडे घालणार आहोत की, संकटातून लवकर मानवाची सुटका कर, सगळीकडे आरोग्य नांदू दे, माणसांचे जगणे पूर्ववत होऊ दे, कोरोना काळातील गणेशोत्सवावर आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा प्रभाव आपल्याला दिसून येणार आहे यामध्ये फेसबुक लाईव्ह द्वारे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही काही संस्था, सार्वजनिक मंडळे करताना दिसत आहेत. प्रत्यक्ष ढोल-ताशा वंदन शक्य नसल्याने ऑनलाईन भजन, भक्तीगीते सादर करून मंगलमय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या काळात गणेश उत्सवाचे बदलत असलेले स्वरूप दिलासा देणारे आहे. दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमासाठी मोठी आर्थिक उलाढाल होत असते त्याद्वारे कलावंतांना संधीही मिळत असते.
सध्याची परिस्थिती पाहता गणेश मंडळांनी आपली ही गंगाजळी समाजहिताच्या आणि आरोग्य सुविधांच्या पूर्ततेसाठी वापरणार असल्याचे ठरविले आहे. मोठ मोठ्या मंडळांचा आदर्श छोटी छोटी मंडळी देखील घेत आहेत हे निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. covid-19चा यशस्वी सामना करण्यासाठी उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षांना स्वच्छतेच्या सुविधा पुरवणे, मास पुरविणे आदी सोबतच रुग्णांना पौष्टिक व शुद्धआहार पुरविण्याच्या कामी देखील अनेक गणेशमंडळांनी पुढाकार घेतला आहे.
श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करून आवश्यक ती धार्मिक कार्ये पार पाडत उपलब्ध निधीचा आणि मनुष्यबळाचा कोरोना वर मात करण्यासाठी वापर करण्याचा मोठा प्रयत्न यंदाच्या गणेशोत्सवात आपल्याला दिसून येईल. माणसांचे प्राण अमुल्य आहेत. त्यांचे आरोग्य निरामय राहणे महत्त्वाचे आहे त्यासाठी आपण सर्वांनी देखील यंदाच्या गणेशोत्सवात शासनाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. आरोग्याला धोका पोहोचू नये म्हणून आपण सामाजिक आंतर पाळत असलो तर समाजाकडे आपल्याला पाठ फिरवायची नाहीये आणि नाका-तोंडावर मास लावला तरी उघड्या डोळ्यांनी अवतीभवती पाहायचे आहे.
फक्त गरज न बनता गरजवंतांना आतापर्यंत धावून जायचे आहे याचेही भान आपण ठेवू या. माणुसकी सांभाळत आपण खरे माणूसपण दाखवून देणार आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान राखत आणि साधेपणाने साजरा करा असे आवाहन जनतेला केले आहे.
सार्वजनिक मंडळासाठी अनेक मार्गदर्शक सूचना शासनाकडून जारी करण्यात आल्या आहेत त्यांचेही मंडळांनी काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. सार्वजनिक विसर्जन मिरवणूक आदिवर बंदी आहे, मंडप ध्वनिक्षेपक यावरही निर्बंध आहेत याचे भान आपण ठेवूयात सार्वजनिक मंडळांनी थर्मामीटर यांची सुविधा ठेवल्यास दर्शन ऑनलाईन उपलब्ध करुन देणे शक्य असल्यास त्याला प्राधान्य दिल्यास मंडळ परिसर सतत निर्जंतुक केल्यास आणि गर्दी होणार नाही याची खबरदारी घेतल्यास या गणेशोत्सवाचा भक्तही निरोगी आनंद घेऊ शकतील. अनेक मंडळांनी मोफत आरोग्य तपासणी, कोरोना चाचणी आदिचे आयोजन केल्यास तेही समाजहिताचे होणार आहे. लोकमान्य टिळकांनी मना मनांना जोडणाऱ्या या गणेशोत्सवाला सव्वाशे वर्षांपूर्वी सार्वजनिक रूप दिलं टिळकांचे हे कार्य प्रासंगिक नव्हतं भारतीय मानसिकतेचा जनमानसाचा सखोल अभ्यास त्यांनी केला होता त्यामुळे कोणत्याही काळात समृद्धीसाठी सामाजिक अभिसरणासाठी गणेशोत्सवाची आवश्यकता आहे हे टिळकांचे विचार आजही आपण पुन्हा जागवतोय त्यातील सर्व कार्य समजून घेऊयात.
बाप्पा चरणी लीन होऊन आपण प्रार्थना करूयात की, कोरोना महासंकटातून तूच आम्हाला बाहेर काढ आणि पुन्हा कधीच असे संकट मानवजातीवर येऊ देऊ नकोस त्यासाठी डॉक्टर्स नर्सेस पोलीस सफाई कर्मचारी आदी मानवाच्या रूपातील परमेश्वराची ही आपण पूजा करूयात त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करूयात तोच आपला खरा गणेशोत्सव ठरेल आणि मानवतेची पूजा ठरेल यात शंकाच नाही.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा