Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २३ ऑगस्ट, २०२०
मुंग उडिद पिकांची नुकसान भरपाईसाठी ३ सप्टेंबरला स्वाभिमानीचा आसुड मोर्चा..!!
शेगाव (शहरं.प्र. उमेश राजगुरे मो.नंबर ९८८१७९४६३२) विमा कंपनीने मुंग व उडीद पिकाचा १००% पिक विमा मंजुर करुण, शासनाने हेक्टरी चाळीस हजार रूपये शेतकऱ्यांना मदत द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तहसिलदार यांना निवेदन देऊन ३ सप्टेंबरला शेगाव तहसिलवर आसुड मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
या वर्षी सतत झालेल्या पावसाने मुंग व उडिद पिकाचे पुर्ण पणे नुकसान झाले आहे. मुंग उडिद पिकाची सर्व मशागत करुन झाडांना शेंगांची लागण न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतातील पिके उखडुन फेकले आहेत. त्यामुळे सर्व शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
या पुर्वि सुध्दा अनेक वेळा पिकाचे नुकसान होउनही पिक विमा कंपनीने तुटपूंजी रक्कम देऊन कंपनिने शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे या वर्षी शेगाव तालुक्यातील मुंग व उडिद पिकाला शेगांची लागण न झाल्याने उत्पन्न शुन्य आहे. लागलेला खर्च भरुन निघत नसल्याने शेतकरी खचून गेलेला आहे.
त्यामुळे मुंग उडिद पिकाचा कंपनिने १००% पिक विमा मंजुर करावा व मुंग उडिद उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी ४० हजार रुपये मदत द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानीने दि.३ सप्टेबंर २०२० रोजी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत शेगाव तहसील कार्यालयावर शेतक-यांचा "आसुड" मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. निवेदनाच्या प्रती पिक विमा कंपनी सह सर्व संबंधित विभागाकडे दिल्या आहेत.
निवेदनावर स्वाभिमानीचे शेगाव शहर अध्यक्ष गोपाल तायडे, विठ्ठल पाहेकर, योगेश तायडे,विजय सावळे,सागर तायडे, मुकेश अजनकार, गजानन तायडे,उमेश इंगोले सह शेतकरी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा