Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०

मोहरम व गणेशोत्सव सण हे शासनाने ठरवुन दिलेल्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करुन साजरे करावे..!अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन..!



प्रतिनिंधी रावेर. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाने जागतीक मानवजातीवर महासंकट असुन त्यावर मात करण्यासाठी आपण आपले मोहरम व गणेशोत्सव सण हे शासनाने ठरवुन दिलेल्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करुन साजरे करावे. असे आवाहन जळगांव जिल्हयाचे  अप्पर जिल्हाधिकारी  प्रविण महाजन यांनी रावेर येथील आयोजित शांतता  समितीच्या बैठकीत केले. 

रावेर येथील मराठा मंगल कार्यालयात  आगामी गणेश उत्सव व मोहरम सणाचे निमित्ताने मा.अप्पर जिल्हाधिकारी श्री प्रविण महाजन सो, मा.अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके मॅडम सो,  SDMश्री डॉ.अजित थोरबोले सो फैजपुर विभाग ,.मा उप.विभागीय पोलिस अधिकारी श्री.नरेंद्र पिंगळे,तहसीलदार सौ उषाराणी देवगुणे, पी.आय. रामदास वाकोडे,मुख्याधिकारी श्री रविंद्र लांडे, पी.एस.आय. शितलकुमार नाईक,मनोज वाघमारे, याचे उपस्थितीत बैठक संपन्न झाले.

यावेळी मा.अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके म्हणाल्या की, घरातील  आणि परिसरातील तरुणांना शिस्तीत राहण्याच्या सुचना करा,मोहरम आणि गणेशोत्सवासाठी ‍ अतिरिक्त कुमक येणार आहे. पोलीस प्रशासन पुर्ण सज्ज आहे. गेल्या वेळेस शहरात झालेला प्रकार निंदनीय आहे. या पुढे हे खपवून घेतेले जाणार नाही. कायदा हातात घेतला तर सरळ गुन्हा दाखल होईल. त्यासाठी कोणाचीही गय केली जाणार नाही.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोहरम आणि गणेशोत्सवासाठी ‍जे नियम शासनाने लागु केले आहे. त्याचे काटेकोरपणे पालन करा. असे आवाहन अप्पर पोलिस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांनी केले आहे.

फैजपुर उप.विभागीय अधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी फैजपुर विभागाची कोरोना विषयक वस्तुस्थिती सांगून नागरीकांनी स्वयंस्फूर्तीने  कोविड 19 ची ॲटीजन टेस्ट करुन घ्या  फैजपुर विभागात  ऑक्सीजन युनिट उभारण्यासाठी  नागरिकांनी भरीव योगदान दिले आहे.दोन्ही तालुक्यात १ हजार टेस्ट होत आहे. मृत्यु दर कमी करण्यासाठी रुग्णांवर तात्काळ इलाज करणेसाठी त्यांना तात्काळ  रूग्णालयात उपचारासाठी दाखल करावे. मोहरम व गणेश उत्सवासाठी शासनाने दिलेले नियमा नुसार शांततेत सण उत्सव साजरे करावे. असे आवाहन डॉ. थोरबोले यांनी केले आहे.
    
यावेळी मौलाना गयासोद्दीन,माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन,मोहरम कमिटी अध्यक्ष शे.गयास शे. रशिद यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
      
रावेर शहरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी तसेच शांतता कमिटी सदस्य,मोहरम पंच कमिटी रावेर,गणपती उत्सव पदाधिकारी,पोलीस पाटील,यांची मिटिंग घेण्यात आली असुन सदर मिटींगला सार्वजनीक गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, नगराध्यक्ष दारा मोहम्मद,  प्रल्हाद महाजन, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन ,हरीश गणवाणी,कामगारनेते दिलीप कांबळे, बाळु शिरतुरे, अशोक शिंदे, पिंटु महाजन,भास्कर पहेलवान ,असद मेम्बर ,युनूस पहेलवान रसलपुर,मस्जिदचे मौलाना, अॅड. प्रविण पाचपोहे, अॅड. योगेश गजरे, पंकज वाघ,असे प्रतिष्ठित नागरिक हजर होते सदर मिटिंग मध्ये खालील प्रमाणे सूचना देण्यात आल्या.सुमारे 150 हिंदू मुस्लिम कार्यकर्ते उपस्थित होते.

1) कोणतेही मंडळ आगमन व विसर्जन मिरवणूक काढणार नाही.
2) सार्वजनिक मंडळाच्या श्री.गणेश मुर्तीची उंची 4 फुटाचे वर नको.
3) सकाळी व सायंकाळी श्री.गणेशाची आरती करताना  सोशल डिस्टन्स चे पालन करावे त्या ठिकाणी सँनिटायझर ची व्यवस्था असावी आरतीला 5 पेक्षा जास्त व्यक्ती नको 
4) प्रतिबंधित क्षेत्र [Containment zone] मध्ये श्री.गणेश  मुर्ती ची स्थापना करता येणार नाही.
5) मंडळातील सदस्य यांनी मास्क व सॅनिटायझर चा वापर करावा.
6) स्थापना करण्यापुर्वी नगरपरिषद कींवा ग्रामपंचायत ची नाहरकत व पोलीस स्टेशन परवानगी घेणे आवश्यक आहे.
7) गणेश मुर्ती ची कोणत्याही प्रकारे विटंबना होणार नाही  त्याकरिता आपल्या मंडळातील 2 सदस्य सकाळी व रात्री मूर्ती जवळ थांबतील.
8) सार्वजनिक जागेवर वाहतुकीस अडथडा होणार   नाही याची खात्री करुन गणेश मंडळाचे  स्टेज उभारावे.
9) कोणत्याही मंडळास भंडारा कींवा जेवणाचा कार्यक्रम  करता येणार नाही
10)विनापरवानगी गणपती   स्थापना केल्यास त्या मंडळावर कायदेशीर कारवाई  करण्यात येईल.
11) वर्गणी जमा करतांना कोणालाही बळजबरी करू नये, तसेच जमा होणाऱ्या वर्गणी मधुन शिल्लक राहीलेल्या रकमेतून सामाजपयोगी कार्य करण्याचा प्रयत्न करावा.

12) मोहरम सणा निमित्त काढण्यात येणाऱ्या सवाऱ्या, चौक्या यांची मिरवणूक न काढता जागेवरच शांत कराव्या.
13) प्रशासनामार्फत वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करावे.
14)कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव पाहता आपले सण उत्सव साधेपणाने साजरे करुन प्रशासनास सहकार्य करावे. 
वगैरे सुचना देऊन मार्गदर्शन केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार दीपक नगरे यांनी केले,प्रास्ताविक Dysp नरेंद्र पिंगळे फैजपूर विभाग यांनी केले असून आभारप्रदर्शन पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे रावेर पो स्ट यांनी केले,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध