Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २२ ऑगस्ट, २०२०

कुरखळी, पिंप्री, सावळदेत कोरोना बाबत जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन..!



कोरोना संक्रमण रोखण्यासाठी ग्रा. पं. प्रशासनाने सजग व कार्यतत्पर राहणे गरजेचे ! - गटविकास अधिकारी


कुरखळी प्रतिनिधी - योगेश्वर मोरे

शिरपूर तालुक्यासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्ष्यात घेता प्रशासनाने उपाययोजना राबविणे सह नागरिकांमध्ये प्रत्यक्ष जनजागृती होणे गरजेचे आहे. 

दिनांक १८ ऑगस्ट रोजी म. जिल्हाधिकारी, धुळे यांच्या आढावा बैठकीत तहसीलदारांना मार्गदर्शन पर जनजागृती कार्यक्रम राबविण्याचे आदेश केल्याने दिनांक २१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत एकूण ११८ ग्रामपंचायतीसह शहरात मार्गदर्शन सभांचे कार्यक्रम नियमाच्या अधीन राहून राबवण्यात येत आहेत. 

जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमासाठी तहसिलदार, नायब तहसीलदार, बाल विकास प्रकल्प अधिकारी, गटविकास अधिकारी, शहर व ग्रामीण पोलीस प्रशासन, गट शिक्षणाधिकारी तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य, पं. स. सदस्य, जि. प. सदस्य, ग्रामसेवक, प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, पोलीस पाटील, आरोग्य सेवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, कृषी सहाय्यक इत्यादी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे, त्यांनी प्रबोधनात्मक जनजागृतीसाठी आपापल्या कार्यक्षेत्रात नियोजनपूर्वक अंमलबजावणी करण्याचे आदेश म. जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. 

त्यानंव्ये दिनांक २१ ऑगस्ट रोजी तालुक्यात आमदार काशीराम जी पावरा यांच्या हस्ते तहसीलदार महसूल विभाग कृषी आरोग्य तसेच पोलीस प्रशासनाच्या उपस्थित शिरपूर तालुक्यातील आमोदे गावापासून जनजागृती व मार्गदर्शन मोहिमेस प्रारंभ झाला. आजचा दुसरा दिवस सकाळी १०. १५ वाजता पिंपरीगाव, १२ वाजता कुरखळी तसेच दुपारी २ वाजता सावळदे गावात मार्गदर्शनासाठी गट विकास अधिकारी श्री वाय डी शिंदे सह महसूल विभाग, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत प्रशासन उपस्थित होते.

मार्गदर्शन :- सोशिअल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका त्यांना बळी पडू नका, तसेच सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव शासकीय आदेशांचे पालन करून साजरा करा अन्यथा करू नका, ढोल ताशे डीजे वापरावर पूर्ण बंदी ठेवा, आशा सेविका तसेच अंगणवाडी सेविका यांना गावात तपासनी सर्वे दरम्यान हॅन्ड ग्लोज, सॅनिटायझर व मास्क पुरवण्यासाठी ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगात खर्चाची अंमलबजावणी करणे. सलून, किराणा दुकान, पान टपरी, रेशन दुकानात गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी नियमांचे उल्लंघन करीत असल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देत ग्रामपंचायत प्रशासनाला सूचक सल्लाही आपल्या मार्गदर्शनातून श्री शिंदे यांनी दिला. आजतागायत शिरपूर तालुक्यात ११८ ग्रामपंचायती पैकी ६० ग्रामपंचायती या कोरोना संक्रमित असून, संक्रमण रोखण्यासाठी गाव पातळीवर योग्य मार्गदर्शन व उपाययोजना असणे आवश्यक आहे. असे गटविकास अधिकारी शिंदे यांनी कुरखळी येथील कार्यक्रमात सांगितले. 
उपाययोजना राबविणे :- अधिक लोकांच्या संपर्कात असताना मास्क लावणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, बाहेरून आल्यावर वारंवार साबणाने हात स्वच्छ करणे, लग्न, अंत्यविधी सह इतर समारंभ करतेवेळी अनावश्यक गर्दी टाळणे, विनाकारण बाहेर न फिरणे, घरात लहान मुलं व वृद्ध व्यक्तींची काळजी घेणे, शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे सहित्याची उपाययोजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमात करण्यात आले. 

याप्रसंगी गटविकास अधिकारी श्री वाय डी शिंदे, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पंचायत समिती कार्यालय अधीक्षक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, अशा सेविका अंगणवाडी सेविका, ग्रामस्थरीय समितीचे सदस्य, जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद, कृषी सहाय्यक, रेशन दुकानदार, पत्रकार व कुरखळी ग्राम सर्वांगीण विकास मंचचे योगेश्वर मोरे व ग्रामस्थ उपस्थित होते याप्रसंगी मुख्याध्यापक श्री गीते सर यांनी सूत्रसंचालन केले तर ग्रामसेवक यांनी प्रास्ताविक सादर केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध